सिंधुदुर्गच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा जिल्हा परिषदेकडून गौरव…

प्रमोद कामत यांच्याकडून उज्ज्वल भविष्यास शुभेच्छा..

⚡सिंधुदुर्गनगरी ता १५-:
दहावी बारावी शालांत परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्हा कायम राज्यात आघाडीवर राहिला आहे याचे श्रेय जिल्ह्यातील यशस्वी विद्यार्थ्यांचे आहे त्यांची मेहनत कष्ट यामध्ये मोठे आहे त्यांनी यापुढेही असेच यशस्वी होऊन वरिष्ठ अधिकारी बनण्याचे स्वप्न पहावे त्यासाठी कष्ट मेहनत आणि अभ्यासातील चिकाटी कायम ठेवून जिल्ह्याचे नावलौकिक करावे अशा शुभेच्छा जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी आज दहावी बारावी मध्ये प्रथम आलेल्या यशस्वी विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमात केले

जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने दहावी बारावी शालांत परीक्षेमध्ये जिल्ह्यात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा आज जिल्हा परिषद सर्वसाधारण विशेष सभेच्या निमित्ताने सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत उपाध्यक्ष दादा साहिल जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर सर्व विषय समिती सभापती जिल्हा परिषद सदस्य अधिकारी उपस्थित होते

यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेमार्फत सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला तर उपस्थित मान्यवरांनी पुढील आयुष्यासाठी व शिक्षणासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या

यावेळी बारावी शालांत परीक्षेत यशस्वी झालेल्या गायत्री विवेकानंद बागलकर , कुडाळ हायस्कूल कुडाळ(९५.६७टक्के),
दत्ताराम शैलेश पै, आरपीडी हायस्कूल सावंतवाडी(९५ टक्के),
वैदेही सचिन पालकर , कट्टा वराडकर कॉलेज तालुका मालवण(९४.८६),
शुभ्रा युगलकिशोर प्रभूगावकर डॉन बॉस्को हायस्कूल ओरोस ता कुडाळ,(९४.८३टक्के),
पुनम दिनेश दळवी कुडाळ हायस्कूल कुडाळ,(९४.१७),

दहावी

राज्ञी विवेक कुलकर्णी , शेठ म ग हायस्कूल देवगड,(१००टक्के,)
भार्गवी अंकुश शेटवे मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडी ,(१००टक्के)
सानवी रघुनाथ कारेकर , विद्या मंदिर हायस्कूल कणकवली,(१००टक्के),
दिया निलेश सामंत , एस एन देसाई विद्यालय पाट तालुका कुडाळ,(९९.८०टक्के),

मुलगे

शुभांशू महेश धुरी, कुडाळ हायस्कूल कुडाळ(९९.६०टक्के),
कृष्णा महेश पास्ते , मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडी(९९.४०),
विराज नंदकिशोर राऊळ, मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडी(९९टक्के),याना आज जिल्हा परिषद् प्रशासनाच्या वतीने सन्मानित करण्यात आले .

You cannot copy content of this page