शिवतेज सेवा संस्थेच्यावतीने बांद्यात भव्य शिवजयंती उत्सवाचे आयोजन
बांदा ता.१८-:* येथील शिवतेज सेवा संस्थेच्यावतीने उद्या शनिवार दिनांक १९ रोजी भव्य शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने मान्यवरांच्या उपस्थितीत पारंपारिक पद्धतीने शिवजन्मोत्सव सोहळा व संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे. येथील जिल्हा परिषद केंद्रशाळेत सकाळी ९ वाजता शिवजन्मोत्सव सोहळा होणार आहे. याठिकाणी व्यासपीठावर किल्ल्याची प्रतिकृती तयार करण्यात…
