शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण : उपाययोजना करण्याची मागणी
बांदा : प्रतिनिधी डिंगणे-बांबरवाडी येथे भर दिवसा काजू बागेत गव्या रेड्यांचा कळप दृष्टीस पडल्याने शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी विलास मांजरेकर यांच्या काजू बागेत तब्बल १५ हुन अधिक गव्यांच्या कळपाचा वावर होता. सायंकाळी उपसरपंच जयेश सावंत, बांदा वनपाल अनिल मेस्त्री यांनी काजू बागायतीत जाऊन पाहणी केली. तसेच काळजी घेण्याबाबत त्यांनी शेतकऱ्यांना सूचना दिल्यात.
