मडुऱ्यात उद्या शिवजयंती उत्सवाचे आयोजन

बांदा ता.१८-:* मडुरा येथील छत्रपती शिवप्रेमी ग्रुपच्या वतीने शनिवार १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त सकाळी ८.३० वाजता मडुरा तिठा ते माऊली मंदिर दरम्यान शिवसूर्य यात्रा, ९.३० वा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन, १० वा. महिलांसाठी हळदीकुंकू व लहान मुलांसाठी वेषभूषा कार्यक्रम, १०.३० वा. श्रम कार्ड योजनेची मोफत नोंदणी करण्यात येईल.

सकाळी ११.३० वा. महिला मंडळाची फुगडी, सायंकाळी ८.३० वा. स्थानिकांचे भजन होईल. शिवप्रेमींनी या सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन छत्रपती शिवप्रेमी ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page