मालवणात २१ रोजी आधार नोंदणी- दुरुस्ती शिबीर

मालवण (प्रतिनिधी) मालवण शहर युवक काँग्रेस आणि मालवणी संस्कृती व वारसा मंडळ, मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आधारकार्ड नोंदणी व दुरुस्ती शिबिर सोमवार दि. २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजता मोंडकर घर, फोवकांडा पिंपळ नजीक मालवण येथे आयोजित करण्यात आले आहे.

या शिबिरात नवीन आधारकार्ड बनविणे, लग्न झाल्या नंतरचा नावातील बदल, लहान मुलांचे आधार कार्ड बनवणे, आधारकार्डला मोबाईल नंबर लिंक करणे तसेच आधारकार्ड मधील सर्व दुरुस्त्या करून मिळणार आहेत. तरी नागरिकांनी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन मालवणी संस्कृती व वारसा मंडळाचे अध्यक्ष अरविंद मोंडकर व युवक काँग्रेस मालवण शहराध्यक्ष गणेश पाडगावकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page