सकल मराठा समाज व सिंधुरक्त मित्र प्रतिष्ठानतर्फे रक्तदान शिबीर

कणकवली ता.१८-:* सकल मराठा समाज ,कणकवली व सिंधुरक्त मित्र प्रतिष्ठान यांच्या वतीने शिवजयंती उत्सव निमित्त साधून कणकवली शिवाजी महाराज चौक येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.

यावेळी सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते भाई परब, बबलू सावंत, बच्चू प्रभुगावकर, महेंद्र सांब्रेकर,अमेय मंडव, ए डी राणे सर,यश सावंत, महेंद्र गावकर, समीर सावंत, अनुप वारंग, सुशांत दळवी, भास्कर राणे, शेखर राणे,सुशील सावंत, महेश सावंत, समीर प्रभुगावकर, तेजस राणे संदीप राणे, मराठा समाज चे कार्यकर्ते व रक्तदाते उपस्थित होते.यावेळी 18 ते 60 वयोगटातील नागरिकांची मोफत मधुमेह तपासणी करण्यात आली.

You cannot copy content of this page