आमदार नितेश राणे यांनी प्रवेशकर्त्यांचे केले स्वागत
कणकवली ता.१८-:* आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत कणकवली तालुक्यातील वागदे गावातील शिवसेना शाखाप्रमुख विजय घाडीगांवकर, युवासेना विभागप्रमुख सुर्यकांत घाडीगांवकर यांच्यासह शिवसैनिकानी भाजप पक्षात प्रवेश केला. यावेळी कणकवली विधानसभा मतदार संघाचे आम. नितेश राणे यांनी त्यांचे स्वागत केले.
यावेळी शिवसैनिक सागर घाडीगांवकर, सत्यवान घाडीगांवकर, आदेश घाडीगांवकर, दिनेश घाडीगांवकर, अभय घाडीगांवकर, गुरुनाथ घाडीगांवकर, बुधाजी घाडीगांवकर यांचा भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश सोबत भाजप कणकवली तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, वागदे शक्ती केंद्र प्रमुख संदीप सावंत,समीर प्रभुगावकर, गोविंद घाडीगांवकर, शिरी घाडीगांवकर, महेश गोसावी व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
