मालवणातील चर्मकार वस्तीचे गुरू रविदास नगर असे नामकरण

मालवण ता.१८-:* मालवणात संत गुरू रविदास यांची जयंती संत शिरोमणी गुरू रविदास मंडळ मालवण शहरअध्यक्ष गणेश पाडगावकर यांच्या अध्यक्षतेखाली साजरी करण्यात आली. यानिमित्त शासनाच्या आदेशानुसार मालवण सोमवार पेठ येथील चर्मकार समाज वस्तीचे ‘गुरू रविदास नगर’ असे नवे नामकरण करून त्याच्या नामफलकाचे अनावरण करून समाजासमोर वेगळा आदर्श ठेवण्यात आला. विशिष्ट समाजाच्या वाडीला जातीनुरूप नाव न देता साधुसंतांचे नाव द्यावे याबाबत शासनाच्या आदेशानुसार मालवण सोमवार पेठ येथील चर्मकार समाज वस्तीला गुरू रविदास नगर असे नाव देण्यात आले.

या नावाच्या फलकाचे उद्घाटन समाज बाळकृष्ण माणगावकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व फित कापून करण्यात आले. यावेळी संत शिरोमणी गुरू रविदास मंडळाचे मालवण शहराध्यक्ष गणेश पाडगांवकर, नितीन चव्हाण, नन्ना माणगावकर, हरीश चव्हाण शाम चव्हाण, प्रसाद आडविलकर, नरेश चव्हाण, बबन आडविलकर, चंदू माणगावकर, श्रीकृष्ण पाडगावकर, दीपक भिलवडकर, विनायक भिलवडकर, हेमंत माणगावकर आदी तसेच रहिवासी उपस्थित होते.

You cannot copy content of this page