ही तर निलेश राणेंचीच नगराध्यक्षांकडून दिशाभूल

नगरसेवक कन्हैया पारकर व रुपेश नार्वेकर यांचा टोला कणकवली ता.२४-:* कै. श्रीधर नाईक उद्यान नूतनीकरण कामासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून नगरोत्थान योजनेतून 75 लाखांचा निधी मंजूर केला आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत 22 जून 2021 रोजीच कै. श्रीधर नाईक गार्डन नूतनीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात…

Read More

कणकवलीत परिवर्तनच्या कला महोत्सवाचा जागर आचरेकर प्रतिष्ठान येथे २५ ते २७ फेब्रुवारी दरम्यान आयोजन

कणकवली 24 फेब्रुवारी (प्रतिनिधी)- जळगावसह खानदेशच्या सांस्कृतिक क्षेत्रातील क्रियाशील संस्था म्हणून परिवर्तन ओळखली जाते. गेल्या काही वर्षपासून परिवर्तनच्या नाटकांचे व सांगीतिक कार्यक्रमांचे महोत्सव राज्यभर होत असतात. कोरोनामुळे मागील वर्षी आठ महोत्सव रद्द करण्यात आले होते. पण आता कणकवलीत परीवर्तन कला महोत्सव २५, २६ व २७ फेब्रुवारी, २०२२ असे तीन दिवस होत आहे. कणकवली येथील वसंतराव…

Read More

कणकवलीतील श्रीधर नाईक उद्यानाचे माजी खास. निलेश राणे यांच्या हस्ते उद्या भूमिपूजन

नरडवे रोड लगत सेल्फी पॉइंटचे वचन सत्यात उतरणार:समीर नलावडे कणकवली ता.२४-:* कणकवली शहरातील महामार्ग चौपदरीकरणात बाधित झालेल्या गडनदी पुलाकडील श्रीधर नाईक उद्यान नूतनीकरण कामाचे भूमिपूजन व कणकवली शहरात तरुणाई साठी वचन दिलेल्या सेल्फी पॉइंट च्या कामाचे भूमिपूजन माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते उद्या 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.30 वाजता करण्यात येणार आहे. अशी माहिती…

Read More

कारिवडे वासियांना येत्या तीन महिन्यात मिळणार रेशन धान्य दुकान…

कारीवडे वासियांसह महेश सारंग यांच्या उपोषणाला अखेर यश; तहसीलदाराच्या आश्वासनानंतर उपोषण सुटले… सावंतवाडी ता.२३-:* कारिवडे गावाला कायमस्वरूपी रेशन धान्य दुकानाचा परवाना मिळावा यासाठी गेली तीन दिवस ग्रामस्थांचा सुरू असलेलं उपोषणला अखेर यश आले असून तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी लेखी पत्र देऊन येत्या तीन महिन्यात रेशन धान्य दुकान गावात सुरू करण्याची लेखी पत्र दिल्यानंतर आज ग्रामस्थांनी…

Read More

मंत्री नवाबांच्या अटकेनंतर महाविकास आघाडी तर्फे केंद्र सरकारचा सावंतवाडीत निषेध

ईइडीच्या माध्यमातून करण्यात आलेली कारवाई सुडबुद्धीची : राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी सावंतवाडी ता.२४-:* राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईइडीच्या माध्यमातून करण्यात आलेली अटकेच्या कारवाई नंतर महाविकास आघाडी तर्फे आज सर्वत्र केंद्र सरकार विरोधात निदर्शने करण्यात आली असून, केंद्र सरकार कडून सुटबुद्धीने करण्यात येणाऱ्या या कारवाईचा निषेध करण्यात आला आहे. राष्ट्रवादी…

Read More

आंगणेवाडी यात्रा उत्साहात सुरू

भाविकांची श्री देवी चरणी मोठ्या संख्येने धाव;पहाटे सुरू झाले दर्शन मालवण ता.२४-:* कोकणात म्हणा किंवा मालवणी मुलखात म्हणा जत्रांची काही कमी नाही आणि जत्रा असल्या म्हणजे आनंदाला तोटा नाही. मात्र गेली दीड दोन वर्ष मालवणी मूलखातच नव्हे महाराष्ट्रात नव्हे तर देश – जगभरात कोरोनाने सगळाच आनंद हिरावून घेतला.त्यातलाच एक जत्रेत फिरण्याचा जो आनंद असतो ना…

Read More

होडावडा सुभाषवाडी येथील बेपत्ता मधुकर झरकर यांचा मृतदेह शेतात आढळला

वेंगुर्ले तालुक्यातील होडावडा सुभाषवाडी येथील बेपत्ता असलेले मधुकर केशव झरकर (वय ७४) यांचा मृतदेह मंगळवारी २२ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वा. च्या सुमारास नजीकच्या शेतात मयत स्थितीत आढळून आला. याबाबत वेंगुर्ले पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यू  नोंद करण्यात करण्यात आली आहे. होडावडा सुभाषवाडी येथील मधुकर झरकर हे १७ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वा. पासून बेपत्ता झाले…

Read More

हे सभागृहाचे कामकाज की पक्षाच्या कार्यालयाचे? : नागेंद्र परब

ओरोस प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या खास सर्वसाधारण सभेत सत्ताधाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा कळस दिसून आला. सत्ताधारी सदस्य कामाच्या याद्या वाचत होते आणि त्या कामांना मंजुरी घेत होते. त्यामुळे हे सभागृहाचे कामकाज होते की पक्षाच्या कार्यालयाचे असा प्रश्न उपस्थित करत या सभागृहात सुरू असलेले काम एका विशिष्ट पक्षाचे असल्याचे दिसून येत असल्याचा आरोप करत या मनमानी आणि…

Read More

विकास आराखडे मंजुरीवरून शिवसेनेचा सभात्याग

विशेष सर्वसाधारण सभा वादळी;मतदानाने झालेले ठराव २५ विरुद्ध १५ मतांनी संमत ओरोस ता.२३-:बुधवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या विशेष सभेत पुन्हा सत्ताधारी भाजप विरुद्ध विरोधी शिवसेना यांच्यात शाब्दिक वाद झाले. विकास कामांच्या याद्या मंजुरी वरून जोरदार खंडांजगी झाली. याद्या मंजुरी २५ विरुद्ध १५ मतांनी करण्यात आली. यावेळी शिवसेना सदस्यांनी घेतलेले आक्षेप प्रशासन प्रमुख सीईओ प्रजित नायर यांनी…

Read More

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाची रक्तपेढी बंद केली जाणार नाही…

अन्न व औषध प्रशासन विभाग मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे दिपक केसरकर यांना आश्वासन… सावंतवाडी ता.२३-:* सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय रक्तपेढी परवाना तात्पुरता स्थगित केला आहे हा प्रश्न लवकरच निकाली काढण्यात येईल व यावर सकारात्मक तोडगा निश्चित काढला जाईल मात्र उपजिल्हा रुग्णालयातील रक्तपेढी बंद केली जाणार नाही असे आश्वासन अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री डॉक्टर…

Read More
You cannot copy content of this page