वेंगुर्ला तालुक्यात ऐन पावसाळ्यात वीज वितरण अधिकारी बदल्या…

श्री. सचिन वालावलकर ; बदल्या स्थगितीसाठी पालकमंत्री यांची भेट घेणार..

⚡वेंगुर्ला ता.१०-: वेंगुर्ला तालुक्यातील विज वितरणात तात्काळ सुधारणा करण्याबाबत विज वितरण उपविभाग वेंगुर्ला यांना वेंगुर्ला तालुका शिवसेना शिष्टमंडळाने आज बुधवारी (10 जून ) भेट घेऊन निवेदन सादर केले. वेंगुर्ला तालुक्यात विज वितरणाबाबत अनेक समस्या असून याबाबत नागरीकांच्या तक्रारी शिवसेना कार्यालयात प्राप्त झाल्या असून वारंवार लाईट जाणे, होल्टेज कमी जास्त होणे, जीर्ण झालेले पोल तातडीने बदलणे, विजेच्या लाईनवरील झाडी तोडून घेणे, ग्राहकांच्या परवानगीशिवाय स्मार्ट मीटर बसविण्यात येऊ नयेत आदी मागण्यांचे निवेदन यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आले.यावेळी शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, वेंगुर्ला पं. स. उपसभापती तथा शिवसेना तालुकाप्रमुख सचिन देसाई, माजी सभापती सुनील मोरजकर, शिवसेना तालुका संघटक बाळा दळवी, शहर पदाधिकारी अजित राऊळ, सत्यवान साटेलकर,
पंकज शिरसाट, स्वप्निल गावडे, संतोष गावडे, उभादांडा पं. स. सदस्या साक्षी नार्वेकर, नगरसेविका लीना म्हापणकर व समिधा रेडकर, आडेली वेतोरे संघटक मितेश परब, उभादांडा उपसरपंच टीना आलमेडा, नयन पेडणेकर, शैलेश नार्वेकर, आबा कोचरेकर, संजय गावडे, स्वप्निल गावडे, दिनेश परब, विक्रांत डिसोजा, रश्मी पेडणेकर, ज्योत्स्ना गावडे आदी व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान
ऐन पावसाळ्यात अधिकारी बदली स्थगितीसाठी पालकमंत्री ना. नितेश राणे यांची भेट घेणार असल्याची माहिती सचिन वालावलकर यांनी दिली. वेंगुर्ला नगरसेविका समिधा रेडकर यांनी “शहरातील विद्युतची दूरध्वनी सेवा पूर्णवेळ सुरु ठेऊन तेथे कायम एक कर्मचारी नियुक्त करण्यात यावा”, अशी मागणी केली.

You cannot copy content of this page