होडावडा सुभाषवाडी येथील बेपत्ता मधुकर झरकर यांचा मृतदेह शेतात आढळला

वेंगुर्ले तालुक्यातील होडावडा सुभाषवाडी येथील बेपत्ता असलेले मधुकर केशव झरकर (वय ७४) यांचा मृतदेह मंगळवारी २२ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वा. च्या सुमारास नजीकच्या शेतात मयत स्थितीत आढळून आला. याबाबत वेंगुर्ले पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यू  नोंद करण्यात करण्यात आली आहे.

होडावडा सुभाषवाडी येथील मधुकर झरकर हे १७ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वा. पासून बेपत्ता झाले होते.गुरुवारी सकाळी ११.३० वा.च्या सुमारास ते  होडावडा बाजारपेठ येथे दाढी करण्यासाठी सलून मध्ये गेले होते. ते घरी न परतल्याने याबाबत त्यांचा मुलगा भिकाजी मधुकर झरकर यांनी वेंगुर्ले पोलीस स्थानकात खबर दिली होती.त्यानुसार वेंगुर्ले पोलिस स्थानकात नापत्ताची नोंद करण्यात आली होती.काल मंगळवारी रात्री ९ वा. ते नजीकच्या शेतात मयत स्थितीत आढळून आले.याबाबतची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक आर.बी.अधिकारी, पोलिस उपनिरीक्षक व्ही.ए. केसरकर,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेखर दाभोलकर यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला.तुळस प्राथमिक आरोग्य केंद्र येथे शवविच्छेदन केल्यानंतर बुधवारी दुपारी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेखर दाभोलकर हे करीत आहेत.

You cannot copy content of this page