मंत्री नवाबांच्या अटकेनंतर महाविकास आघाडी तर्फे केंद्र सरकारचा सावंतवाडीत निषेध

ईइडीच्या माध्यमातून करण्यात आलेली कारवाई सुडबुद्धीची : राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी

सावंतवाडी ता.२४-:* राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईइडीच्या माध्यमातून करण्यात आलेली अटकेच्या कारवाई नंतर महाविकास आघाडी तर्फे आज सर्वत्र केंद्र सरकार विरोधात निदर्शने करण्यात आली असून, केंद्र सरकार कडून सुटबुद्धीने करण्यात येणाऱ्या या कारवाईचा निषेध करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्या नेतृत्वाखाली गांधी चौक येथे महाविकास आघाडी तर्फे निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत, काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे, शिवसेना उप जिल्हा प्रमुख अशोक दळवी, राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षा रेवती राणे, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, काँग्रेस उप तालुका अध्यक्ष समीर वंजारी, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष देवेंद्र टेमकर, काँग्रेस शहर अध्यक्ष अँड राघवेंद्र नार्वेकर, माजी नगरसेविका अफरोज राजगुरू, अनारोजिन लोबो, दिपाली सावंत, भारती मोरे, माजी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, माजी नगरसेवक विलास जाधव,शफीक खान, अगस्तीन फर्नांडिस, इफ्तीगार राजगुरू, जावेद शेख, संतोष जोईल, विल्यम सालढणा, सुरेश भोगटे, हिदायतुल्ला खान, आसिफ ख्वाजा, रिद्धी परब, सावली पाटकर, श्रुतिका दळवी, शिवानी पाटकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page