कारीवडे वासियांसह महेश सारंग यांच्या उपोषणाला अखेर यश; तहसीलदाराच्या आश्वासनानंतर उपोषण सुटले…
सावंतवाडी ता.२३-:* कारिवडे गावाला कायमस्वरूपी रेशन धान्य दुकानाचा परवाना मिळावा यासाठी गेली तीन दिवस ग्रामस्थांचा सुरू असलेलं उपोषणला अखेर यश आले असून तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी लेखी पत्र देऊन येत्या तीन महिन्यात रेशन धान्य दुकान गावात सुरू करण्याची लेखी पत्र दिल्यानंतर आज ग्रामस्थांनी उपोषण स्थगित केले आहे.
यावेळी जिल्हा बँक संचालक महेश सारंग यांनी उपोषण स्थळी ठाण मांडून कारिवडे ग्रामस्थांना जाहीर पाठिंबा देत याबाबत शासनाचे लक्ष वेधले होते. त्यांनी ग्रामस्थांच्या बाजूने उभे राहत दिलेल्या लढ्याला यश आले आहे.
