अन्न व औषध प्रशासन विभाग मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे दिपक केसरकर यांना आश्वासन…
सावंतवाडी ता.२३-:* सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय रक्तपेढी परवाना तात्पुरता स्थगित केला आहे हा प्रश्न लवकरच निकाली काढण्यात येईल व यावर सकारात्मक तोडगा निश्चित काढला जाईल मात्र उपजिल्हा रुग्णालयातील रक्तपेढी बंद केली जाणार नाही असे आश्वासन अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी दिले सावंतवाडी चे आमदार दीपक केसरकर यांनी आज त्यांची भेट घेतली यावेळी मंत्री डॉक्टर शिंगणे यांनी रक्तपेढी चा प्रश्न निश्चितपणे सोडविण्यात येईल कुठल्याही परिस्थितीत रुग्णांची गैरसोय होऊ दिले जाणार नाही असे स्पष्ट केले.
सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयातील रक्तपेढी बेकायदेशीररित्या काम सुरू असल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणीत आढळले आहे त्यामुळे या रक्तपेढीला च्या बाबतीत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे रक्त संकलन उत्पादन विक्री आणि वितरण बंद करण्याचे आदेशही ठाणे विभागाचे सहआयुक्त यांनी दिले आहेत त्यामुळे गेल्या दोन दिवसापासून ही रक्तपेढी तात्पुरत्या स्वरूपात स्थगित ठेवण्यात आली आहे तसेच त्याचा परवानाही स्थगित करण्यात आला आहे. सावंतवाडी दोडामार्ग वेंगुर्ले या तीन तालुक्यासाठी महत्त्वाची असलेली ही रक्तपेढी अचानक रित्या बंद पडल्याने रुग्णांची मोठी गैरसोय निर्माण झाली होती याबाबत आमदार केसरकर यांनी काल मंगळवारी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त परिमल सिंग यांची भेट घेतली होती त्यानंतर आज बुधवारी आमदार केसरकर यांनी मंत्री डॉक्टर शिंगणे यांची भेट घेतली व त्यांना वस्तुस्थिती कथन केली
