केंद्रीय लघु सूक्ष्म उद्योग खात्यातील वेगवेगळ्या योजनांचे मार्गदर्शन शिबिराचे २५ फेब्रुवारी रोजी आयोजन …

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणार उपक्रम..

वैभववाडी प्रतिनिधी : केंद्रीय मंत्री व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या संकल्पनेतून ओरोस शरद भवन येथे शुक्रवार दि. 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत उद्योजकांना मार्गदर्शन व केंद्रीय लघु सूक्ष्म उद्योग खात्यातील वेगवेगळ्या उद्योग विषयातील योजना यांचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

नवीन नाविन्यपूर्ण उद्योगांची ओळख ही यावेळी देण्यात येणार आहेत. वैभववाडी तालुक्यातील सर्व उद्योजकांना सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे. नवीन उद्योग उभारण्यासाठी लागणारी सर्व माहिती यावेळी सूक्ष्म लघु आणि उद्योग मंत्रालयातील तज्ञ मार्गदर्शक आपणास देणार आहेत. आधुनिक टेक्नॉलॉजी, अर्थपुरवठा व केंद्र शासनाकडून मिळणारी सबसिडी यांचेही मार्गदर्शन यावेळी करण्यात येणार आहे. या योजनांची माहिती व लाभ घेण्यासाठी तालुक्यातील इच्छुक उद्योजकांनी उपस्थित रहावे असे आवाहन भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष राजू पवार यांनी केले आहे.

You cannot copy content of this page