गुळदुवे येथे शेतकऱ्यांना गोकृपा अमृतम जीवाणू संवर्धनाबाबत मार्गदर्शन…

⚡सावंतवाडी ता.१०-:
रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय व शाश्वत शेतीला चालना देण्याच्या दृष्टीने, गुळदुवे येथे कृषी विभागाच्यावतीने शेतकऱ्यांसाठी “गोकृपा अमृतम “या जीवाणू संवर्धनाचे प्रात्यक्षिक दाखवून उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

सदर कार्यक्रमात विविध विषय हाताळण्यात आले.यात “शेत बचाओ अभियान “बाबत शास्त्रज्ञ कृषी विज्ञान, केंद्र किर्लोस चे बाळकृष्ण गावडे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
आत्मा BTM मीनल परब यांनी ,राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत शेतकरी गट बनविणे व कृषी सखी निवड करण्याबाबत माहिती दिली.
तर सहाय्यक कृषी अधिकारी, आरोंदा प्रिया तेली यांनी गोकृपा अमृत प्रात्यक्षिक करत बीजप्रक्रिया बाबत मार्गदर्शन केले .
यावेळी गुळदुवे ग्रामपंचायत सदस्य , सीआरपी ,विकास ग्रामसंघातील महिलावर्ग,गावातील प्रगतशील शेतकरी रुपेश धर्णे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page