अमृतमहोत्सवी अभियानाअंतर्गत लोकसहभाग व लोकवर्गणीतून तलावातील गाळ काढण्यासाठी नियोजन करा…

संजू शिरोडकर यांची मुख्याधिकारी यांच्याकडे मागणी सावंतवाडी ता.०५-:* येथील मोती तलावातील गाळ काढणे व सुशोभीकरण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार आधारित अमृतमहोत्सवी अभियानांतर्गत लोकसहभाग व लोकवर्गणीतून नियोजन करण्यात यावे अशी मागणी संजू शिरोडकर यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Read More

सेवानिवृत्त शिक्षक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकाऱ्यांचा आनंद मेळावा संपन्न

कोरोनामुळे दोन वर्षांनी झाला कार्यक्रम सावंतवाडी ता.०५-: कोरोना काळातील 2 वर्षाच्या खंडानंतर सिंधुदुर्ग जिल्हा सेवा निवृत्त शिक्षक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी यांचा वार्षिक आनंद मेळावा तालुकाध्यक्ष दत्ताराम अनंत फटनाईक यांच्या अध्यक्षतेखाली श्री सिद्धिविनायक सभागृह माजगाव येथे नुकताच उत्साहात संपन्न झाला.    यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाध्यक्ष सावळाराम अणावकर जिल्हा सचिव सुंदर पारकर मार्गदर्शक म्हणुन राजाराम चिपळूणकर,…

Read More

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रभारी वैद्यकीय अधीक्षकपदी डॉ. संदीप सावंत

सावंतवाडी ता.०५-:* येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रभारी वैद्यकीय अधीक्षकपदी बालरोगतज्ज्ञ म्हणून डॉ. संदीप सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे या रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. उत्तम पाटील हे ३१ मार्च रोजी निवृत्त झाले त्या रिक्त पदी डॉ. सावंत यांनी १ एप्रिलपासून प्रभारी वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. डॉ. सावंत हे येथील तालुक्यात गेली १९ वर्षे सेवा…

Read More

बिगर परवाना बांधकामासाठी आकारण्यात आलेला दंड रद्द करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करा…

मनसे तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांची तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी सावंतवाडी ता.०५-:* तालुक्यातील निवासी प्रयोजनासाठी बिगर परवाना बांधकामास आकारण्यात आलेला दंड रद्द करण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यात यावा अशी मागणी मनसे तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांनी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांची भेट घेऊन निवेदन देऊन केली आहे.

Read More

ध्येयवेडे व्यक्तिमत्व : साक्षी वंजारी

सावंतवाडी ता.०५-: राजकारण आणि समाजकारणाचा वारसा घरातूनच मिळालेल्या काँग्रेसच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ. साक्षी वंजारी यांची यशस्वीतेच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. महिला सक्षमीकरण आणि विकासाचा ध्यास घेतलेल्या साक्षीताईंच्या वाढदिनी आज त्यांचे व्यक्तिमत्व आणि कार्याचा घेतलेला संक्षिप्त आढावा… माजी नगराध्यक्ष दिलीप नार्वेकर तसेच वडील आणि आजोबा यांच्यापासून त्यांना राजकारणाचे धडे मिळाले त्यांचे आजोबा स्वातंत्र्यसैनिक होते तर…

Read More

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

*🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥* 💐हार्दिक शुभेच्छा…!!💐हार्दिक शुभेच्छा..!!💐हार्दिक शुभेच्छा..!!💐_ 🤚🎂 सिंधुदुर्ग महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सौ .साक्षी वंजारी यांना वाढदिवसाच्य हार्दिक हार्दिक शुभेच्छा🤚💐🎂 🔯🔯शुभेच्छुक🔯🔯 💐▪️श्री.बाळा गावडे. जिल्हाध्यक्ष :राष्ट्रीय काँग्रेस; सिंधुदुर्ग 💐▪️श्री.राजू मसुरकर जिल्हा काँग्रेस सरचिटणीस 💐▪️श्री.दिलीप नार्वेकर माजी नगराध्यक्ष ;सावंतवाडी 💐 श्री. महेंद्र सांगेलकर तालुकाध्यक्ष:राष्ट्रीय कांग्रेस; सावंतवाडी 💐सौ.स्मिता वाघळे महिला तालुकाध्यक्ष: राष्ट्रीय काँग्रेस; सावंतवाडी ▪️💐श्री.समीर वंजारी उपतालुकाध्यक्ष:राष्ट्रीय कांग्रेस;सावंतवाडी…

Read More

३५ कोटी ५९ लाखांचा शिलकी अर्थसंकल्प

सावंतवाडी नगरपरिषद:प्रशासनाने केला सादर;आरोग्य, पाणी, रस्ते, स्वच्छतेला प्राधान्य सावंतवाडी ता.०४-:* सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष आणि कार्यकारणीचा कार्यकाल संपल्यानंतर नगरपरिषदावर प्रशासक नेमला आहे. त्यामुळे यंदाचा सावंतवाडी नगरपरिषदेचा वार्षिक अर्थसंकल्प प्रथमच प्रशासकाकडून मांडण्यात आला आहे. शिलकी अर्थसंकल्प प्रशासनाने मांडला. यामध्ये अखेरची शिल्लक ३५ कोटी ५९ लाख ६६ हजार १४१ एवढी आहे. सावंतवाडी नगरपरिषदवर १७ डिसेंबरपासूनच प्रशासक म्हणून प्रांताधिकारी…

Read More

“त्या” बैल झुंजीतील ‘कोकण किंग 2022’ चषक पोलिसांनी केला जप्त…

मालवण दि प्रतिनिधी मालवण तालुक्यातील तळगाव येथे झालेल्या बेकायदेशीर बैल झुंजीतील विजेत्या अर्जुन बैलाचे मालक रुपेश पावसकर याना देण्यात आलेला विजेता कोकण किंग २०२२ हा चषक मालवण पोलिसांनी कुडाळ येथील राजाराम कुंभार यांच्या घरातून जप्त केला आहे. दरम्यान, तळगाव येथील बैल झुंज प्रकरणातील आयोजक व मालकांवर पोलिसांनी कडक कारवाई करावी तसेच अशा प्रकारच्या झुंजीच्या स्पर्धांना…

Read More

रस्ता डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे ग्रामस्थांनी केले उघड…

ग्रामस्थांच्या आक्रमक पवित्र्यानंतर ठेकेदाराने केली चूक मान्य… मालवण दि प्रतिनिधी रस्त्यांच्या निकृष्ट कामावर ग्रामस्थांची नाराजी हा आता नित्याचाच भाग बनला आहे. आचरा हिर्लेवाडी वायंगणी ला जोडणाऱ्या रस्त्याच्या काम चालू असून हे नूतनीकरणाचे कामही त्याला अपवाद नाही. सोमवारी  सकाळी चालू असलेल्या रस्त्याच्या  कामात  डांबराचा अत्यल्प वापर होत असल्याचे समजताच ग्रामस्थांनी कामाच्या ठिकाणी धडक देत  काम निकृष्ट होत असल्याचे…

Read More

मधु वालावलकर समाज सेवक पुरस्कार श्रीकांत सांबारी यांना जाहीर…

मालवण दि प्रतिनिधीमालवण येथील बॅरिस्टर नाथ पै सेवांगणच्यावतीने दिला जाणारा मधु वालावलकर समाज सेवक पुरस्कार” आचरे येथील श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिरचे विद्यमान अध्यक्ष श्रीकांत रघुनाथ सांबारी यांना जाहीर झाला आहे. रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप असून सदर पुरस्काराचे वितरण रविवार दिनांक ८ मे २०२२ रोजी संध्याकाळी ४ वाजता श्री देव रामेश्वर…

Read More
You cannot copy content of this page