ध्येयवेडे व्यक्तिमत्व : साक्षी वंजारी

सावंतवाडी ता.०५-: राजकारण आणि समाजकारणाचा वारसा घरातूनच मिळालेल्या काँग्रेसच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ. साक्षी वंजारी यांची यशस्वीतेच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. महिला सक्षमीकरण आणि विकासाचा ध्यास घेतलेल्या साक्षीताईंच्या वाढदिनी आज त्यांचे व्यक्तिमत्व आणि कार्याचा घेतलेला संक्षिप्त आढावा…

माजी नगराध्यक्ष दिलीप नार्वेकर तसेच वडील आणि आजोबा यांच्यापासून त्यांना राजकारणाचे धडे मिळाले त्यांचे आजोबा स्वातंत्र्यसैनिक होते तर वडील गोविंद वासुदेव बेर्डे हे सुद्धा कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात बरीच वर्ष सक्रिय होते सासरी पती समीर वंजारी आणि सासूबाई यांच्या प्रोत्साहनामुळे त्या आज काँग्रेसच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्ष म्हणून यशस्वी काम करत आहे त्यांचा राजकीय प्रवास सन 2011 पासून सुरू झाला त्यांचे माहेर कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी पन्हाळा येथे लग्नानंतर सावंतवाडीत आल्यावर त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली.

लग्नानंतर सुरुवातीच्या पाच ते सहा वर्ष त्यांनी फॅशन डिझाइनिंग शिवणकला हॉटेलिंग आणि गारमेंट या क्षेत्रात काम करत महिलांशी सुसंवाद साधला. कोरोना मुळे बेरोजगार झालेले हजारो चाकरमानी आपल्या गावी परतले आहेत त्यांना इथेच उद्योग व्यवसायात गुंतवणूक ठेवण्याची हीच संधी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याला नैसर्गिक करून दिलेला आहे येथे आंबा काजू कोकम व अन्य फळांवरील प्रक्रिया उद्योग व्हायला हवेत आता मुंबई-पुण्याकडे जाण्याची गरज नाही तरुण पिढीला येथेच थांबून हे प्रक्रिया उद्योग प्रकल्प उभे करून त्यांना तिथेच गुंतवणूक करत असल्याचे त्या सांगतात.

1 जानेवारी 2022 रोजी काँग्रेस राष्ट्रीय कार्यकारणी त्यांची जिल्हाध्यक्षपदी फेर निवड केली अलीकडेच झालेल्या या गोवा विधानसभा निवडणुकीत पक्षाने त्यांच्यावर दिलेली शिवोली आणि कलंगुट या मतदारसंघाची जबाबदारी सोपवली होती.शिवोली मतदार संघात यापूर्वी राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार कधीही विजय झाला नव्हता काँग्रेससाठी अत्यंत कठीण असलेल्या या मतदारसंघात सर्व वंजारी यांनी 40 पेक्षा जास्त कॉर्नर बैठक घेत या मतदारसंघात राष्ट्रीय काँग्रेसच्या हिलाय लोबो यांना निवडून आणले. कलंगुट विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे मायकल लोबो हे पाच हजार मतांनी विजयी झाले या यशाबद्दल साक्षी वंजारी यांची महाराष्ट्र प्रदेशj काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी अभिनंदन करून पक्ष लवकर त्यांच्या मोठी जबाबदारी दिली जात असल्याचं भाकीत केले आहे. नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे यांनी आपल्याला भेटीचे निमंत्रण दिले तेव्हा आपल्या कामाची पोचपावती मिळाली तिथून आपण राजकारणात सक्रिय झाल्याचे सांगतात. साक्षीताईंच्या राजकीय आणि सामाजिक कार्याची पोचपावती म्हणून लवकरच त्यांच्याकडे मोठी जबाबदारी येऊन त्यातही त्या यशस्वी होवोत, याच आजच्या वाढदिनी “ग्लोबल महाराष्ट्र”कडून शुभेच्छा…!

You cannot copy content of this page