आंबोली घाटातील कामांची चौकशी लावा…

पंचायत समिती सदस्य मायकल डिसोजा:उपवनसंरक्षकांना निवेदन सादर..

⚡आंबोली ता.१५-:
आंबोली घाटातील महामार्ग क्रमांक ५४८ एचच्या कामांबाबत पंचायत समिती सदस्य मायकल डिसोझा यांनी वन विभागाकडे तक्रार केली आहे. या कामादरम्यान वन विभागाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करत त्यांनी उपवनसंरक्षक, वन विभाग सावंतवाडी यांच्याकडे निवेदन सादर केले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, आंबोली घाट परिसर हा पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील भाग आहे. या ठिकाणी सुरू असलेल्या रस्ते कामांमुळे जंगल व नैसर्गिक संपत्तीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. संबंधित कामांमध्ये आवश्यक परवानग्या, नियम व अटींचे पालन होत आहे का, याची तपासणी करणे गरजेचे आहे.
तसेच कामामुळे होणारे वृक्षतोड, माती वाहून जाणे व पर्यावरणीय नुकसान याबाबत वन विभागाने लक्ष घालावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. संबंधित ठेकेदार व यंत्रणांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्यास योग्य ती कारवाई करावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या निवेदनाच्या प्रती संबंधित वन अधिकारी व प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. आंबोली घाटातील पर्यावरण संवर्धनासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी मायकल डिसोझा यांनी केली आहे.

You cannot copy content of this page