सेवानिवृत्त शिक्षक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकाऱ्यांचा आनंद मेळावा संपन्न

कोरोनामुळे दोन वर्षांनी झाला कार्यक्रम

सावंतवाडी ता.०५-: कोरोना काळातील 2 वर्षाच्या खंडानंतर सिंधुदुर्ग जिल्हा सेवा निवृत्त शिक्षक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी यांचा वार्षिक आनंद मेळावा तालुकाध्यक्ष दत्ताराम अनंत फटनाईक यांच्या अध्यक्षतेखाली श्री सिद्धिविनायक सभागृह माजगाव येथे नुकताच उत्साहात संपन्न झाला.

   यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाध्यक्ष सावळाराम अणावकर जिल्हा सचिव सुंदर पारकर मार्गदर्शक म्हणुन राजाराम चिपळूणकर, त्याचबरोबर व्यासपीठावर जिल्हा कोषाध्यक्ष ना. य. सावंत जिल्हा उपाध्यक्ष भरत आवळे श्री भालेकर जिल्हा सदस्य श्री नरसुले, स्त्री प्रतिनिधी श्रीम मुननकर आणि दोडामार्ग व वेंगुर्ला तालुकाध्यक्ष यांचे सहकारी उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते या मेळाव्याचे दीपप्रज्वलन व विघ्नहर्ता गजाननाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उद्घाटन करण्यात आली.

 यानंतर सन 2019 ते 2022 या कालावधीमध्ये संघटनेचे दिगवंत सदस्य कै कुसगावकर, दशरथ गोडकर, लवू कळगुटकर, शंकर राऊळ, महेंद्र नाटेकर, मोतीराम कदम, शंकर कदम, श्रीधर सावंत, सूर्यकांत सावंत, सुरेश मुननकर, अनंत गावडे, कै मातोंडकर, शशिकांत मळेवाडकर, गान सम्राज्ञी लता मंगेशकर, सिनेस्टार रमेश देव,दशावतार कलाकार सुधीर कलिंगण यांना श्रद्धांजली वाहण्यात आली तर संघटनेतील 75 वर्षे पूर्ण झालेल्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

     या मेळाव्याप्रसंगी मागील इतिवृत्त व जमाखर्चाचे वाचन तालुका सचिव श्री सावंत भोसले यांनी केले यावेळी चिपळूणकर यांनी श्री ब्रह्मदेव महात्म्य हे 110 ओवीरूपी स्वतः लिहिलेल्या पुस्तके मधील ओव्यांचे सादार्थ महात्म्य सांगून सर्वांना मंत्रमुग्ध केले शेवटी तालुकाध्यक्ष श्री फटनाईक यांनी उपस्थितांचे आभार मानत मान्यवरांचे देखील आभार मानले

You cannot copy content of this page