संजू शिरोडकर यांची मुख्याधिकारी यांच्याकडे मागणी
सावंतवाडी ता.०५-:* येथील मोती तलावातील गाळ काढणे व सुशोभीकरण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार आधारित अमृतमहोत्सवी अभियानांतर्गत लोकसहभाग व लोकवर्गणीतून नियोजन करण्यात यावे अशी मागणी संजू शिरोडकर यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
