ग्रामस्थांच्या आक्रमक पवित्र्यानंतर ठेकेदाराने केली चूक मान्य…
मालवण दि प्रतिनिधी रस्त्यांच्या निकृष्ट कामावर ग्रामस्थांची नाराजी हा आता नित्याचाच भाग बनला आहे. आचरा हिर्लेवाडी वायंगणी ला जोडणाऱ्या रस्त्याच्या काम चालू असून हे नूतनीकरणाचे कामही त्याला अपवाद नाही. सोमवारी सकाळी चालू असलेल्या रस्त्याच्या कामात डांबराचा अत्यल्प वापर होत असल्याचे समजताच ग्रामस्थांनी कामाच्या ठिकाणी धडक देत काम निकृष्ट होत असल्याचे उपड करत संतप्त ग्रामस्थांनी काम रोखून धरले जोपर्यत डांबरा विना पसरलेली कधी काढून डांबर घालून खडी पसरली जात नाही तोपर्यंत काम चालू करू देणार नसल्याच्या इशारा ग्रामस्थांनी ठेकेदाराला दिला. ग्रामस्थांच्या आक्रमक पवित्र्यानंतर चूक मान्य करत ठेकेदाराने पसरलेली खडी काढण्याचे काम हाती घेतले होते.
सोमवारी सकाळी काही ग्रामस्थ आचरा तिठा येथे येत असताना कामाची पाहणी केली असता रस्त्याचे काम निकृष्ट होत असल्याचे निदर्शनास आले त्यांनी याबाबत ठेकेदाराला विचारणा करत काम थांबवण्यास सांगून याची माहिती आचरा सरपंच प्रणया टेमकर, उपसरपंच पांडुरंग वायंगणकर यांना दिली. काम निकृष्ट होत असल्याचे समजताच सरपंच टेमकर, उपसरपंच वायंगणकर, सोसायटी अध्यक्ष अवधूत हळदणकर, समीर बावकर, व हिर्लेवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होत रस्त्याचे काम थांबवले. रस्ता नूतनीकरण कामासाठी सुरुवातीला जे खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे, त्यात खड्यांमधील धूळ नीट साफ केली गेली नाही. तसेच खडी टाकण्यापूर्वी पुरेसे डांबरही खड्यात ओतले गेलेले नाही.
त्यामुळे नुसती खडी घातलेले रस्ते किती दिवस टिकणार हा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित करत संबंधित ठेकेदार माने याला ग्रामस्थांनी धारेवर धरले या रस्त्यावरून स्थानिक रहिवाशांबरोबरच दरवर्षी हजारो पर्यटक आचरासह वायंगणी, तोंडवळी आणि तळाशीलमध्ये जातात कामाचा दर्जा जर नीट नसेल तर हा रहदारीचा रस्ता टिकेल का असा सवाल करत याचे भान ठेवून दर्जेदार काम करा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. दरम्यान ग्रामस्थांनी जोपर्यंत रस्त्यावर नुसती पसरलेली खडी पुन्हा काढून डांबर घालून जोपर्यंत पसरवली जात नाही तोपर्यंत काम चालू करू देणार नसल्याचे सांगून काम बंद पडले. ग्रामस्थांच्या आक्रमक पवित्र्यानंतर संबंधित ठेकेदाराने आपली चूक मान्य करत रस्त्यावर पसरलेली खडी काढण्याचे काम हाती घेतले होते
