Headlines

दांडेलीत पाईपलाईन खोदाईची माती घरात घुसली

अधिकाऱ्यांसह ठेकेदाराचेही दुर्लक्ष : ग्रामस्थांचे मात्र त्रासदायक हाल बांदा ता.२४-:* नुकत्याच दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने दांडेली-आरोस बाजार येथे खोदाई करण्यात आलेल्या पाईपलाईनची माती ग्रामस्थ संदीप माणगावकर यांच्या घरात घुसली. तसेच बाजारपेठेतील अन्य दुकानातही काही प्रमाणात पाणी शिरले. पाण्याला जाण्यासाठी मोरी पूल व गटार आवश्यक असताना त्याकडे मात्र प्रशासनाने दुर्लक्षच केल्यामुळे आमच्यावर अशी परिस्थिती आल्याचे श्री….

Read More

सावंतवाडी पंचायत समितीचे माजी सभापती राजू परब यांना मातृशोक

सावंतवाडी ता.२४-:* सावंतवाडी पंचायत समितीचे माजी सभापती राजू परब यांच्या मातोश्री तथा मळगांव कुंभार्ली रस्तावाडा येथील रहिवासी हेमलता बापू परब यांचे सोमवारी रात्री राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ८५ वर्षांच्या होत्या. हेमलता परब या महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री कै. भाईसाहेब सावंत यांच्या धाकटी बहीण तर जिल्हा बँकेचे माजी संचालक काँग्रेस नेते विकासभाई सावंत यांची त्या…

Read More

साळीस्ते येथे कारच्या भीषण अपघात दोघांचा मृत्यू

मुंबई-गोवा महामार्गावर अपघात;टॉयटो कार दुभाजकाला आदळली कणकवली ता.२३-:* मुंबई-गोवा महामार्गावर साळीस्ते येथे कारची दुभाजकाला धडक बसून भीषण अपघात झाला. हा अपघात सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास झाला.या अपघातात संतोष पांडुरंग हरमळकर (वय ४८,प्रभादेवी मुंबई, मूळ रा.पेडणे गोवा),सुधीर अर्जुन राणे (वय -५६ वर्ष ,रा,अंधेरी ,मुबंई) हे दोघे जण मयत झाले आहेत. याबाबत सविस्तर वृत्त असे की,मुंबई येथून…

Read More

मोफत रक्त तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

शिवतेज सेवा संस्थेचे आयोजन बांदा/प्रतिनिधी येथील शिवतेज सेवा संस्थेच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या मोफत रक्त तपासणी शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. तब्बल ७५ हुन अधिक रुग्णांची रक्त तपासणी करण्यात आली. शिबिराचे उदघाट्न वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वललन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून संपन्न झाले. यावेळी वैद्यकीय…

Read More

जानवली नदी उड्डाण पुलाला डॉ आंबेडकर यांचे नाव द्यावे

सिंपन प्रतिष्ठानची केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना निवेदन वैभववाडी प्रतिनिधी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कणकवली येथील जानवली नदीवरील उड्डाण पुलाला भारतरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दयावे. अशी मागणी सिंपन प्रतिष्ठान मुंबई यांनी केंद्रीय रस्ते वाहातूक आणि महामार्ग मंञी नितीन गडकरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. सिंपन ही संस्था गेली अनेक वर्षे मुंबई व विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यरत…

Read More

२५ पासून जिल्ह्यात शिव संपर्क अभियान

पक्षाला नवचैतन्य प्राप्त होणार;बबन शिंदे, हरी खोबरेकर यांची माहिती मालवण दि प्रतिनिधी राज्यात शिवसेनेच्यावतीने शिवसंपर्क अभियान राबविण्यात येणार असून जिल्ह्यात २५ मे ते २८ मे या कालावधीत शिवसेना सचिव अनिल देसाई यांच्या नेतृत्त्वाखाली खासदार विनायक राऊत, समन्वयक बोरकर, संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर, आमदार वैभव नाईक, स्थानिक लोकाधिकारी समिती यांच्या माध्यमातून हे अभियान राबविण्यात येत आहे. या…

Read More

तोक्ते वादळाच्या नुकसानीसाठी केंद्राची किती मदत मिळाली

वादळावेळी नारायण राणेंचे कार्यकर्ते कुठे होते ? ;आ वैभव नाईक यांचा केंद्रीयमंत्री राणेंना सवाल मालवण दि प्रतिनिधी तोक्ते वादळ झाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या नुकसानभरपाई पोटी राज्य शासनाने ४० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. यात मालवण शहरासह किनारपट्टी भागात झालेल्या नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळाली. तौक्ते वादळात झालेल्या नुकसानीचे ज्यांनी ज्यांनी पंचनामे केले त्या…

Read More

शिरवल सोसायटीवर‌ शिवसेनेचा झेंडा

चेअरमनपदी रविकांत सावंत तर व्हाईस चेअरमनपदी दयानंद कोदे कणकवली ता.२३-:* कणकवली तालुक्यातील शिरवल विविध कार्यकारी विकास सेवा सोसायटी लि. शिरवल सोसायटीच्या चेअरमनपदी शिवसेना पुरस्कृत श्री.लिंगरवळनाथ शेतकरी विकास पॅनेलचे रविकांत ‌यशवंत सावंत यांची तर व्हाईस चेअरमनपदी दयानंद दत्ताराम कोदे यांची निवड झाली आहे. निवडीकरीता अध्यासी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली शिरवल सोसायटी कार्यालय येथे संचालक मंडळ सभेचे आयोजन…

Read More

वेंगुर्ल्यातील अंमली पदार्थांच्या तस्करीवर आळा घाला

पोलिस निरीक्षक मोरे यांना दिले निवेदन वेंगुर्ला ता.२३-:* सिधुदुर्ग पर्यटन जिल्ह्यात अंमली पदार्थांची राजरोजसपणे होणारी तस्करी, लागवड, सेवन व वाहतुकीस तातडीने आळा घालावा, अशी मागणी वेंगुर्ल्यातील सर्व राजकिय पक्ष, सामाजिक, स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते व पालक यांनी एकत्रितपणे लेखी निवेदनाद्वार वेंगुर्ला निरीक्षक तानाजी मोरे यांच्याकडे केली आहे. पर्यटनदृष्ट्या सामाजिक व आर्थिक विकास होताना परराज्यातून होणारी…

Read More

कोविड मधील एकल महिला आणि अनाथ बालके यांच्या पुनर्वसनास प्राधान्य द्या

विधानपरिषद उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे सिंधुदुर्गनगरी ता.२३-:* कोविड काळामध्ये सर्वंच यंत्रणांनी केलेले काम निश्चितपणे कौतुकास्पद आहे. मात्र येणाऱ्या काळात सर्वांनी कोविडमध्ये आधार गमवावा लागलेल्या एकल महिला आणि बालके यांच्या पुनर्वसनाकडे लक्ष द्यावे लागेल. असे प्रतिपादन विधानपरिषद उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी केले आहे. रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषद…

Read More
You cannot copy content of this page