सिंपन प्रतिष्ठानची केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना निवेदन
वैभववाडी प्रतिनिधी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कणकवली येथील जानवली नदीवरील उड्डाण पुलाला भारतरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दयावे. अशी मागणी सिंपन प्रतिष्ठान मुंबई यांनी केंद्रीय रस्ते वाहातूक आणि महामार्ग मंञी नितीन गडकरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सिंपन ही संस्था गेली अनेक वर्षे मुंबई व विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यरत आहे.मे १९३८ साली कणकवली येथे झालेल्या ऐतिहासिक परिषदेचे अध्यक्षपद डाॕ.बाबासाहेब आंबेडकरांनी भूषविले होते. म्हणून ही परिषद जिल्ह्यातील चळवळीच्या दृष्टीने महत्वाची मानली जाते. या परिषदेच्या इतिहासाला उजाळा मिळावा यासाठी परिषदेचा सुवर्ण महोत्सव १९८८ तर अमृत महोत्सव २०१३ साली संपन्न झाला आहे.
१९३८ साली ज्या महामानवाच्या पदस्पर्शाने ही कनकभूमी पावन झाली आहे. त्याच जागेवरुन जानवली नदी उड्डाण पुलाची सुरुवात होते. त्यामुळे या पुलाला डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देणे सर्वार्थाने योग्य होईल. अशी मागणी केंद्रीय रस्ते वाहातूकमंञी नितीन गडकरी यांच्याकडे सिंपन प्रतिष्ठान मुंबई यांच्यावतीने अध्यक्ष अनिल तांबे, कार्याध्य डाॕ.संदीप कदम, सरचिटणीस बाळकृष्ण जाधव, कोषाध्यक्ष दत्ता पवार, भगवान कांबळे, गोपाळ जाधव, सत्यविजय तांबे, अशोक कांबळे, मधुकर जाधव, लक्ष्मण चौकेकर, डाॕ.श्रीकांत धारपवार,धनाजी जाधव, रामानंद मोडक, राजेश कदम, वैशाली यादव, चितरंजन कदम, निवेदनाद्वारे केली आहे.
