शिवतेज सेवा संस्थेचे आयोजन
बांदा/प्रतिनिधी येथील शिवतेज सेवा संस्थेच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या मोफत रक्त तपासणी शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. तब्बल ७५ हुन अधिक रुग्णांची रक्त तपासणी करण्यात आली.
शिबिराचे उदघाट्न वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वललन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून संपन्न झाले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. मयुरेश पटवर्धन, परिचरिका कीर्ती भाईप, संस्थेचे खजिनदार भूषण सावंत, निलेश मोरजकर, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे प्रयोगशाळा तंत्रज्ञ अमित लिंगवत, सुनील सोन्सूरकर, बांदा प्रयोगशाळा तंत्रज्ञ रुपेश देसाई, सहाय्यक अमेय गवस, श्वेता वराडकर, अक्षय मयेकर, संकेत वेंगुर्लेकर, नारायण बांदेकर, केदार कणबर्गी, प्रथमेश राणे, प्रशांत गवस, समीर परब, सोनू बांदेकर, दिक्षा गवस आदी उपस्थित होते.
या शिबिरात ३० वर्षे वयोगटावरील रुग्णांची CBC, LFT, KFT, TFT (थायरॉईड ), PCR-HBV, PCR-HCV या टेस्ट मोफत करण्यात आल्या. यावेळी शिवतेज संस्थेच्या आरोग्य विषयक उपक्रमाचे डॉ. पाटील यांनी कौतुक केले.
