मालवण : (प्रतिनिधी)

मालवण पोलीस ठाणे येथे विराजमान २१ दिवसांच्या गणेशोत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या उत्सवानिमित्त गुरुवार, १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता कु. वेदिका परशुराम लुडबे यांचे कीर्तन होणार आहे. शुक्रवार, २ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता सत्यनारायण महापूजा, ११ वाजता श्रींची आरती व तीर्थप्रसाद, तर दुपारी १ पासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री ८ वाजता बाळकृष्ण दशावतार नाट्य मंडळ, कोळंब-मालवण यांच्या संयुक्त संचात दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे. रविवार, ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता श्रींची विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे. सर्वांनी कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मालवण पोलीस ठाण्यातर्फे करण्यात आले आहे.
