Headlines

वेंगुर्ला तालुक्यात अंगारकी संकष्टी चतुर्थी उत्साहात

वेंगुर्ला
वेंगुर्ला तालुक्यात मंगळवारी अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त श्री गणपती दर्शनासाठी भाविकांनी ठिकठिकाणी मंदिरात तसेच 17, 21 दिवसासाठी विराजमान असलेल्या गणपती दर्शनासाठी गर्दी केली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध रेडी द्विभुज गणपती मंदिर, वेंगुर्ला श्री देव रामेश्वर मंदिर, जुना एसटी स्टँड गणपती मंदिर, कॅम्प येथील गणपती मंदिर, वायंगणी सुरंगपाणी गणपती, वेतोरे येथील गणपती मंदिर तसेच तालुक्यातील अन्य भागात गणपती मंदिरात भाविकांनी अंगारकी संकष्टी निमित्त श्री गणेशाचे दर्शन घेतले. तसेच यावेळी गणेशोत्सव निमित्त वेंगुर्ला पोलीस ठाणे, तसेच तालुक्यातील प्रमुख लोकप्रतिनिधी, नागरिक यांच्या घरी श्री गणेश विराजमान असल्याने सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी यांनी गणपती दर्शन घेतले. यावर्षी गणेश चतुर्थी कालावधीत पावसाने पूर्णतः विश्रांती घेतल्याने भाविकांमध्ये गणेश दर्शनासाठी उत्साह जाणवून आला.

You cannot copy content of this page