Headlines

वडाचापाट येथे ३ रोजी धम्म प्रवचन कार्यक्रम

मालवण (प्रतिनिधी)

दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा, तालुका शाखा मालवण, संस्कार विभागातर्फे ‘वर्षावास धम्म प्रवचन मालिका २०२६’ अंतर्गत ‘सतरावे पुष्प’ म्हणून विशेष धम्म प्रवचनाचे आयोजन केले आहे. सदर प्रवचन ३ ऑक्टोबरला सायंकाळी ७ वाजता गाव शाखा वडाचापाट येथे होणार आहे.

या कार्यक्रमात ‘साकेत (अयोध्या) नगरीचा खरा इतिहास’ या विषयावर विश्वनाथ कदम मार्गदर्शन करणार आहेत. भारतीय बौद्ध महासभेच्या तालुका शाखा मालवणच्या संस्कार विभागातर्फे आयोजित या धम्म प्रवचनाला धम्म बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page