२५ पासून जिल्ह्यात शिव संपर्क अभियान

पक्षाला नवचैतन्य प्राप्त होणार;बबन शिंदे, हरी खोबरेकर यांची माहिती

मालवण दि प्रतिनिधी राज्यात शिवसेनेच्यावतीने शिवसंपर्क अभियान राबविण्यात येणार असून जिल्ह्यात २५ मे ते २८ मे या कालावधीत शिवसेना सचिव अनिल देसाई यांच्या नेतृत्त्वाखाली खासदार विनायक राऊत, समन्वयक बोरकर, संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर, आमदार वैभव नाईक, स्थानिक लोकाधिकारी समिती यांच्या माध्यमातून हे अभियान राबविण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर तालुक्यातही शहरासह पंचायत समिती मतदार संघनिहाय बैठका घेत शिवसेनेत नवचैतन्य निर्माण करण्याचे काम केले जाणार आहे अशी माहिती शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे आणि तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी संयुक्त रित्या घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

कुंभारमाठ येथे शिवसेनेची कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीत आमदार वैभव नाईक यांनी शिवसंपर्क अभियानाबाबतचा आढावा घेतला. यावेळी माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, संग्राम प्रभूगावकर, बाबा आंगणे, मंदार केणी, बाबी जोगी, प्रसाद मोरजकर, बाळ महाभोज, नंददिपक गावडे, कमलाकर गावडे यांच्यासह शिवसेनेचे तालुक्यातील विविध विभागातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. शिवसंपर्क अभियानाच्या निमित्ताने शहरात तसेच पंचायत समिती मतदार संघात बैठका घेतल्या जाणार आहेत. यात पक्षाची सभासद नोंदणी, ज्येष्ठ पदाधिकार्‍यांचा सन्मान, पदाधिकार्‍यांमध्ये बदल, विकासात्मक, संघटनात्मक कामाबरोबर येत्या काळात होऊ घातलेल्या निवडणूकांमध्ये यश मिळविण्यासाठी कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी हे शिवसंपर्क अभियान प्रेरणादायी ठरेल असा विश्‍वास श्री. शिंदे, श्री. खोबरेकर यांनी यावेळी व्यक्त केला.

You cannot copy content of this page