सावंतवाडी पंचायत समितीचे माजी सभापती राजू परब यांना मातृशोक

सावंतवाडी ता.२४-:* सावंतवाडी पंचायत समितीचे माजी सभापती राजू परब यांच्या मातोश्री तथा मळगांव कुंभार्ली रस्तावाडा येथील रहिवासी हेमलता बापू परब यांचे सोमवारी रात्री राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले.

त्या ८५ वर्षांच्या होत्या. हेमलता परब या महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री कै. भाईसाहेब सावंत यांच्या धाकटी बहीण तर जिल्हा बँकेचे माजी संचालक काँग्रेस नेते विकासभाई सावंत यांची त्या आत्ये होय. तसेच सावंतवाडी पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र उर्फ राजू परब व काँग्रेस महिला पदाधिकारी सुमेधा उर्फ नूतन सावंत यांची त्या आई तर भाजपा महिला तालुकाध्यक्षा गीता परब यांची त्या सासू व झोळंबे हायस्कूलचे शिक्षक समीर परब यांच्या त्या काकी होत. हेमलता परब या गेले काही दिवस आजारी होत्या.त्यांच्यावर गोवा येथील खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले होते.

त्या नंतर त्यांना घरी आणण्यात आले होते. अशातच सोमवारी रात्री ११.३५ च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, तीन मूली, सूना, जावई, भाचे, पुतणे, पुतण्या, नातवंडे असा मोठा परिवार आहे. मंगळवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. हेमलता परब यांच्या निधनाने संपूर्ण परब कुटुंबिय व मळगांव गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

You cannot copy content of this page