Headlines

पोईप येथील वर्दम हायस्कुलच्या १९९१ दहावी बॅचचा स्नेहमेळावा संपन्न

मालवण ता.२८-:* मालवण तालुक्यातील पोईप विरण येथील पोईप सर्कल एज्युकेशन सोसायटी संचालित सौ. इं. द. वर्दम हायस्कूलच्या सन १९९१ सालच्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नुकताच प्रशालेत संपन्न झाला. या निमित्ताने या माजी विद्यार्थ्यांनी प्रशालेला २०० खुर्च्या व ४ पंखे भेट स्वरूपात दिले. या स्नेहमेळाव्याचे उद्घाटन संस्थेचे सेक्रेटरी महेश पालव व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व महामानवांच्या…

Read More

पेंडूर येथे दशावतारी कलाकारांचा सन्मान

मालवण ता.२८-:* पेंडुर येथील श्री देवी सातेरी कला क्रीडा मंडळातर्फे सुधीर कलिंगण स्मृतिप्रित्यर्थ जिल्ह्यातील ज्येष्ठ दशावतारी कलाकारांचा सत्कार नुकताच करण्यात आला. प्रथम सुधीर कलिंगण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच काही मिनिटे स्तब्ध उभे राहून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सिंधुदुर्गातील दशावतार ही कला जवळपास ८०० वर्षे जोपासली जाते. या दशावतार कलेमध्ये अनेक कलाकारांनी गावागावात…

Read More

महिला शिवसैनिकांच्या तत्परतेमुळे ‘त्या’ महिलेचा हरवलेला मोबाईल परत मिळाला…

*ममालवण ता.२८-:* मालवण शहरातील मामा वरेरकर नाट्यगृहासमोरील रस्त्यावर पडलेला मोबाईल शिवसेना माजी नगरसेविका सेजल परब व पूजा तळाशील यांना शुक्रवारी रात्री ८ वाजण्याच्या दरम्यान दिसून आल्यानंतर त्यांनी तो मोबाईल ताब्यात घेतला. पोलीस प्रशासनाच्या ताब्यात मोबाईल द्यावा या उद्देशाने त्या निघाल्या असताना त्याच दरम्यान त्या मोबाईलवर रिंग वाजली. पूजा यांनी तो कॉल उचलला असता समोरून एका…

Read More

कोंडुरा येथील अन्यायग्रस्तांकडून मुख्यमंत्री ठाकरे यांना निवेदन

*⚡वेंगुर्ला ता.२८-:* आम्हा गरीब शेतक-यांची व प्रशासनाला कर भरणा-या सर्व जनतेची आपल्या प्रशासनाकडून व पक्षाच्या पदाधिका-यांकडून नेत्यांकडून होत असलेली फसवणूक थांबून आमच्या वडिलोपार्जित उपजीविकेची माड बागायती वाचविण्यात यावी अशी मागणी वेंगुर्ला तालुक्यातील कोंडुरा येथील नारायण पेडणेकर, प्रशांत पेडणेकर, सुचिता टेमकर, प्रणाली पेडणेकर, निता पेडणेकर, सुमित्रा पेडणेकर या अन्यायग्रस्त शेतक-यांनी जिल्हाधिकारी यांचेमार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना…

Read More

तोडलेल्या झाडांची नुकसानी भरपाई मिळण्यासाठी जिल्हाधिका-यांना निवेदन

वेंगुर्ला ता.२८-:* विद्युत कंपनीने आम्हाला कोणतीही पूर्वकल्पना न देता विज वाहिनी नेताना आमची उत्पान्नाची असलेली काजूची झाडे मुळासकट तोडली आहेत. याबाबत संबंधित कार्यलयाशी विचारणा करुनही त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली आहेत. त्यामुळे आपण प्रत्यक्ष पहाणी करुन आम्हाला नुकसान भरपाई मंजूर करावी आणि संबंधितांवर कायदेशीर कारवाई अशा आशयाचे लेखी निवेदन वेतोरे-सबनीसवाडा येथील रहिवासी सुमित्रा सदानंद गावडे व…

Read More

प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांना स्व.एकनाथ ठाकूर स्मृती पुरस्कार

वेंगुर्ला येथे ११ जून रोजी होणार पुरस्काराचे वितरण *⚡वेंगुर्ला ता.२८-:*-२०१७ सालापासून सुरु झालेला स्व.एकनाथ ठाकूर स्मृती पुरस्कार यंदा सुविख्यात अभिनेते, उत्तम वक्ते, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचे अभ्यासक तसेच कर्करोगावर यशस्वीपणे मात करणारे शरद पोंक्षे यांना प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांचा हस्ते वेंगुर्ला येथील…

Read More

अतुल्य‘च्या दिवाळी अंक स्पर्धेत ‘किरात दिवाळी अंक‘ सर्वोत्कृष्ट

*⚡वेंगुर्ला ता.२८-:* गणपतराव कदम मार्ग मनपा माध्यमिक शाळा या वरळी-मुंबई स्थित शाळेतील विद्यार्थ्यांनी ‘अतुल्य सेवा संस्था‘ नावाची एक सेवाभावी संस्था स्थापन केली आहे. या संस्थेतर्फे वृद्ध, अपंग, अनाथ नागरिकांची मोफत सेवा केली जाते. अन्नदानही केले जाते. यंदा या संस्थेने दिवाळी अंक स्पर्धांचे प्रथमच आयोजन केले होते. यात सहभागी झालेल्या २२ अंकांमधून सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक म्हणून…

Read More

जैतिर देवाचा वार्षिक उत्सव ३० मे पासून

वेंगुर्ला ता.२८-:* दक्षिण कोकणातील जागृत देवस्थान, नराचा नारायण म्हणून सुपरिचीत असलेले तुळव गावचे ग्रामदैवत श्री जैतीर देवाचा वार्षिक उत्सव दि.३० मे पासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर मंदिरांची रंगरंगोटी पूर्ण झाली असून मंदिर परिसरात दुकानेही थाटून ११ दिवस चालणा-या या उत्सावासाठी दुकानदारांनी आपली जागा निश्चित केली आहे. अत्यंत जागृत असलेल्या या देवाच्या दर्शनासाठी मुंबई, ठाणे,…

Read More

ठाकर समाज सिंधुदुर्गच्या पाठीशी कणकवली तालुका राहणार

विविध मागण्यांसाठीच्या ६ जूनच्या आमरण उपोषणाचा पाठींबा कणकवली ता.२८-:* सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाजाच्या विविध मागण्या असून मागण्या मान्य न झाल्यास सोमवार ६ जून २०२२ पासून आमरण उपोषणाचा इशारा सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाज सिंधुदुर्ग कडून देण्यात आलेला आहे . याकरिता सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाज सिंधुदुर्गच्या पाठीशी कणकवली तालुका कायम असणार आहे. असे या सभेस सर्वानुमते ठरले….

Read More

२७ जूनला होणार सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाची निवडणूक –

सावंतवाडी ता.२८-:* सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाची निवडणूक २७ जून रोजी होणार आहे. यात अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यवाह, खजिनदार सहकार्यवाह आणि कार्यकारिणी सदस्य अशी १५ पदासाठी ही निवडणूक असणार आहे.अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वसंत उर्फ अण्णा केसरकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. येथील मालवणी गेस्ट हाऊस मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी अशोक करंबेळकर…

Read More
You cannot copy content of this page