विविध मागण्यांसाठीच्या ६ जूनच्या आमरण उपोषणाचा पाठींबा
कणकवली ता.२८-:* सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाजाच्या विविध मागण्या असून मागण्या मान्य न झाल्यास सोमवार ६ जून २०२२ पासून आमरण उपोषणाचा इशारा सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाज सिंधुदुर्ग कडून देण्यात आलेला आहे . याकरिता सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाज सिंधुदुर्गच्या पाठीशी कणकवली तालुका कायम असणार आहे. असे या सभेस सर्वानुमते ठरले. सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाज सिंधुदुर्ग तालुका शाखा – कणकवली या संघटनेची कणकवली तालुक्यातील सर्व समाज बांधवांची सभा अशियेमठ, समाज मंदीर येथे संपन्न झाली. सदर सभेमध्ये ६ जून २०२२ पासुन जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे खालील समस्यांवर आंदोलन करण्यात येणार आहे.
१) जमिन महसुल अधिनीयम १९६६ चे कलम ३६(४) नुसार अदिवासी जामिनी बँकेकडे गहाण ठेवणेसाठी गहाणखत करणे . २) ठाकर समाजाकरीता समाज भवन बांधणे करीता भूखंड उपलब्ध करून देणे. ३) पेण येथिल प्रकल्प कार्यालय ओरोस येथे सुरु करणे .४) जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये सिंधुदुर्गातील आदिवासींना आरक्षण मिळणे .या मागण्यांकरिता सोमवार ६ जून २०२२ पासून मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाज सिंधुदुर्ग कडून देण्यात आलेला आहे . याकरिता सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाज सिंधुदुर्गच्या पाठीशी कणकवली तालुका कायम असणार आहे. असे या सभेस सर्वानुमते ठरले. सदर सभेमध्ये कणकवली तालुका अध्यक्ष वैभव ठाकूर ( ग्रामसेवक) यांनी आपल्या हुंबरट ग्रामपंचायत मध्ये “विधवा प्रथा बंद करण्यात आल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले.
