महिला शिवसैनिकांच्या तत्परतेमुळे ‘त्या’ महिलेचा हरवलेला मोबाईल परत मिळाला…

*ममालवण ता.२८-:* मालवण शहरातील मामा वरेरकर नाट्यगृहासमोरील रस्त्यावर पडलेला मोबाईल शिवसेना माजी नगरसेविका सेजल परब व पूजा तळाशील यांना शुक्रवारी रात्री ८ वाजण्याच्या दरम्यान दिसून आल्यानंतर त्यांनी तो मोबाईल ताब्यात घेतला. पोलीस प्रशासनाच्या ताब्यात मोबाईल द्यावा या उद्देशाने त्या निघाल्या असताना त्याच दरम्यान त्या मोबाईलवर रिंग वाजली. पूजा यांनी तो कॉल उचलला असता समोरून एका महिलेने घाबरलेल्या स्वरात “माझा मोबाईल हरवला तुम्हाला सापडला का” अशी विचारणा केली.

त्यावर पूजा यांनी मोबाईल रस्त्यात पडलेला सापडल्याचे सांगित आपण भरड नाका येथे आहोत ओळख पटवून मोबाईल घेऊन जा असे त्या महिलेस सांगितले. मालवण शहरात राहणारी ती महिला काही वेळात भरड नाका येथे आली. त्या महिलेचे नाव पत्ता विचारात व खात्री करत सेजल व पूजा यांनी तो मोबाईल त्या महिलेच्या ताब्यात दिला. हरवलेला मोबाईल पुन्हा सापडल्याने त्या महिलेने सेजल परब व पूजा तळाशीलकर यांचे आभार मानले.

You cannot copy content of this page