मालवण ता.२८-:* पेंडुर येथील श्री देवी सातेरी कला क्रीडा मंडळातर्फे सुधीर कलिंगण स्मृतिप्रित्यर्थ जिल्ह्यातील ज्येष्ठ दशावतारी कलाकारांचा सत्कार नुकताच करण्यात आला. प्रथम सुधीर कलिंगण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच काही मिनिटे स्तब्ध उभे राहून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सिंधुदुर्गातील दशावतार ही कला जवळपास ८०० वर्षे जोपासली जाते.
या दशावतार कलेमध्ये अनेक कलाकारांनी गावागावात आपले नाव नाट्यरसिकांच्या मनात साठवून ठेवले आहे. त्यातील सुरेश धुरी, यशवंत तेंडोलकर, दिलीप मेस्त्री, भास्कर सामंत, बाळा जामदार, प्रशांत मेस्त्री, बाबी वेतुरकर, मास्तर मार्ये, बाळा सावंत, अरुण राणे, बाबा खानोलकर, बाबली नाईक, बाळा कलिंगण, उदय कोनसकर आदी कलाकारांचा शाल, श्रीफळ व मानचिन्ह देऊन मंडळाच्यावतीने सत्कार करण्यात आला. त्यानंतर रात्री ९ वा. श्री देव कलेश्वर दशावतार नाट्य मंडळाचा ट्रिकसिनयुक्त ‘अजिंक्यतारा’ हा नाट्यप्रयोग झाला. सूत्रसंचालन नीलेश गुरव यांनी केले.
