पोईप येथील वर्दम हायस्कुलच्या १९९१ दहावी बॅचचा स्नेहमेळावा संपन्न

मालवण ता.२८-:* मालवण तालुक्यातील पोईप विरण येथील पोईप सर्कल एज्युकेशन सोसायटी संचालित सौ. इं. द. वर्दम हायस्कूलच्या सन १९९१ सालच्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नुकताच प्रशालेत संपन्न झाला. या निमित्ताने या माजी विद्यार्थ्यांनी प्रशालेला २०० खुर्च्या व ४ पंखे भेट स्वरूपात दिले. या स्नेहमेळाव्याचे उद्घाटन संस्थेचे सेक्रेटरी महेश पालव व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व महामानवांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी माजी विद्यार्थ्यांचा महेश पालव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रशालेचे मुख्याध्यापक डि. एन. कांबळे. यांनी प्रास्ताविक करून संस्थेची व प्रशालेची शैक्षणिक प्रगती व संस्थेच्या पुढील संकल्पना याबाबत माहिती दिली.

जुनियर कॉलेजच्या प्रशस्त हॉल मध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये लग्न विधी समारंभ व अन्य कार्यक्रम आयोजित करण्यासाठी भविष्यात उपक्रम राबवले जाणार आहेत ही गरज ओळखून माजी विद्यार्थ्यांनी खुर्ची व पंखे भेट स्वरूपात दिले. यावेळी अमेरिका स्थित माजी विद्यार्थी मार्टिन फर्नांडिस यांनी माजी विद्यार्थ्यांचे प्रशालेवर प्रेम असून प्रशालेचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही, शाळेच्या गुरुजनांनी दिलेल्या ज्ञानामुळेच आम्ही मोठे झालो, याची जाणीव प्रत्येकाने ठेवावी, असे विचार व्यक्त केले. तसेच महेश पालव यांनी शुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी विचार मंचावर माजी विद्यार्थी मार्टिन फर्नांडिस, महेश मेस्त्री, अमोल परब, सुनील गावडे, संजय माने आदी व इतर उपस्थित होते. शेवटी मुख्याध्यापक श्री. कांबळे यांनी सर्वांचे आभार मानले.

You cannot copy content of this page