प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांना स्व.एकनाथ ठाकूर स्मृती पुरस्कार

वेंगुर्ला येथे ११ जून रोजी होणार पुरस्काराचे वितरण

*⚡वेंगुर्ला ता.२८-:*-२०१७ सालापासून सुरु झालेला स्व.एकनाथ ठाकूर स्मृती पुरस्कार यंदा सुविख्यात अभिनेते, उत्तम वक्ते, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचे अभ्यासक तसेच कर्करोगावर यशस्वीपणे मात करणारे शरद पोंक्षे यांना प्रदान करण्यात येणार आहे.

हा पुरस्कार महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांचा हस्ते वेंगुर्ला येथील मधुसुदन कालेलकर सभागृहात शनिवार दि. ११ जून रोजी दुपारी ३ वाजता श्री.पोंक्षे यांना प्रदान केला जाणार आहे. तसेच यावेळी ‘समाजसुधारक सावरकर‘ या विषयावर शरद पोंक्षे यांचे व्याख्यानही होणार आहे. तरी या सोहळ्याला जिल्हावासीयांनी उपस्थितीत रहावे असे आवाहन स्व. एकनाथ ठाकुर स्मृती पुरस्कार समितीचे डॉ.अमेय देसाई व वेंगुर्ला येथील कार्यक्रमाचे संयोजक प्रसन्ना देसाई यांनी केले आहे.

You cannot copy content of this page