Headlines

कणकवली शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाची सभासदांसाठी मोफत कुपन योजना

⚡कणकवली ता.१२-: कणकवली तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करीत असून या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त संघाच्यावतीने सभासदांसाठी ‘ सुवर्णसंधी निर्माण करून देण्यात येत आहे . या निमित्ताने प्रत्येक सभासदाला ५०० रुपयांचे मोफत कुपन देण्यात येत असून खरेदी विक्री संघाच्या कोणत्याही शाखेतून एवढ्या रक्कमेचा माल खरेदी करू शकतात , अशी माहिती कणकवली…

Read More

माझ्या संघर्षामुळे विनायक राऊत खासदार

आ दीपक केसरकर यांचे वक्तव्य;यानंतर पहिली निवडणूक;खासदारकीची आहे, हे राऊत यांनी लक्षात ठेवण्याचेही केले आवाहन ⚡सावंतवाडी ता.१२-: मी संघर्ष केल्यामुळेच विनायक राऊत हे खासदार म्हणून निवडून आले. पुढील निवडणूक ही पहिली खासदारकीची आहे.हे विनायक राऊत यांनी ध्यानात ठेवावे असा इशारा आमदार दीपक केसरकर यांनी आज इथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला आहे. यावेळी बोलताना केसरकर म्हणाले…

Read More

मतदार संघात येताच आ केसरकर यांनी घेतला विकासकामांचा आढावा

कामे प्रलंबित राहिल्यास खपवून घेणार नसल्याचा दिला इशारा ⚡सावंतवाडी ता.१२-:* तालुक्यात राहिलेली कामे बाहेरचे ठेकेदार घेऊन पूर्ण करा. तीन तीन वर्ष कामे होत नाहीत. हे खुपवून घेणार नाही. असा इशारा आमदार दीपक केसरकर यांनी दिला. श्री.केसरकर यांच्या उपस्थितीत आज आढाव बैठक येथील तहसील कार्यालयात संपन्न झाली.यावेळी श्री.केसरकर बोलत होते. यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की,…

Read More

कुडाळात भाजपने केले रास्ता रोखो आंदोलन

रस्त्यातील खड्ड्यांवरून घेतली आक्रमक भूमिका;मुख्याधिकारी यांच्या आश्वासनानंतर केले आंदोलन स्थगित ⚡कुडाळ ता.१२-: शहरात रस्त्यांवर वाढलेल्या खड्ड्यांमुळे येथून वाहतूक करणाऱ्या वाहन धारकांना खड्यातून जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याने या बाबत आज दुपारी कुडाळ शहर भाजप तर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले .यावेळी प्रशासनाच्या कामकाजा विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शहरातील पोलीस स्टेशनच्या नजीकत असलेल्या रस्त्यावर पडलेल्या…

Read More

संदेश पारकर यांचा वाढदिवस 14 जुलै रोजी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा होणार

⚡कणकवली ता.१२-: शिवसेना नेते तथा कोकण पर्यटन विकास समिती उपाध्यक्ष संदेश पारकर यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा मातोश्री मंगल कार्यालय, कणकवली येथे मान्यवरांच्या उपस्थितीत गुरुवार 14 जुलै 2022 रोजी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे.यादिवशी सकाळी 8:30 वाजता कै.सुबोध टिकले यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबीर आयोजित केले आहे. तसेच सकाळी 10:30 वाजता गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार…

Read More

प्रा.अरविद सावंत यांना व्यासंगी वाचक पुरस्कार

⚡वेंगुर्ला ता.१२-: वेंगुर्ला नगरवाचनालय संस्थेतर्फे देण्यात येणारा व्यासंगी वाचक पुरस्कार यावर्षी प्रा.अरविद विश्राम सावंत यांना जाहीर झाला असून १७ जुलै रोजी या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.

Read More

भजनी सप्ताहानिमित्त संगीत-वारकरी मंडळांना निमंत्रित

⚡वेंगुर्ला ता.१२-: वेंगुर्ल्याचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वराचा अखंड भजनी सप्ताहाला गुरुवार दि.१४ जुलै पासून प्रारंभ होत असून दररोज होणा-या अष्टोप्रहर भजनांबरोबरच १५ संगीत व वारकरी भजन मंडळांना निमंत्रित करण्यात आले आहे.

Read More

वेंगुर्ल्यात १३ ऑगस्ट रोजी लोकअदालतीचे आयोजन

⚡वेंगुर्ला ता.१२-: तालुका विधी सेवा समिती, वेंगुर्ला व तालुका बार असोसिएशन, वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १३ ऑगस्ट २०२२ रोजी दिवाणी न्यायालय, वेंगुर्ला येथे सकाळी १०.३० वाजता राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

Read More

आरवली हॉस्पिटलमध्ये १७ रोजी नेत्रतपासणी

⚡वेंगुर्ला ता.१२-: आरवली वैद्यकीय आणि संशोधन केंद्र हॉस्पिटलमध्ये रविवार दि. १७ जुलै रोजी प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ.नेहा पावसकर-कोल्हे या सकाळी १० वाजता उपस्थित राहून रुग्णांची नेत्र तपासणी करणार आहेत. गरजू रुग्णांनी आपली नावनोंदणी (०२३६६) २२२७३२ किवा ९८२३४३५५०२ या नंबरवर करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

Read More

तळेरे येथे मधु कट्टयाचे अनावरण

गझलकार स्व.मधुसुदन नानिवडेकर यांचा प्रथम स्मृती दिन ⚡कणकवली ता.१२-: जेष्ठ कवी,गझलकार स्व.मधुसुदन नानिवडेकर यांच्या प्रथम स्मृती दिनाचे औचित्य साधून तळेरे येथील डॉ.मिलिंद कुलकर्णी व डॉ.सौ.ऋचा कुलकर्णी यांच्या चैतन्य नर्सिंग होम समोरील प्रांगणात “मधु कट्टा” उभारण्यात आला.त्या मधु कट्टयाचे अनावरण डॉ.सौ.ऋचा मिलिंद कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले.

Read More
You cannot copy content of this page