माझ्या संघर्षामुळे विनायक राऊत खासदार

आ दीपक केसरकर यांचे वक्तव्य;
यानंतर पहिली निवडणूक;खासदारकीची आहे, हे राऊत यांनी लक्षात ठेवण्याचेही केले आवाहन

⚡सावंतवाडी ता.१२-: मी संघर्ष केल्यामुळेच विनायक राऊत हे खासदार म्हणून निवडून आले. पुढील निवडणूक ही पहिली खासदारकीची आहे.हे विनायक राऊत यांनी ध्यानात ठेवावे असा इशारा आमदार दीपक केसरकर यांनी आज इथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला आहे.

यावेळी बोलताना केसरकर म्हणाले सिंधुदुर्ग जिल्ह्यात विकास कामांसाठी निधी मी आणल्याचं खासदार विनायक राऊत हे कौतुक करत होते.मात्र तेच राऊत आता माझ्या विरोधात कोणत्या तोंडाने टीका करत आहेत. यापुढे ठाकरे शिंदे गट एकत्र आल्यास विनायक राऊत कोणत्या तोंडाने माझ्याकडे येणार असा सवाल ही केसरकर यांनी यावेळी उपस्थित केला.

You cannot copy content of this page