Headlines

मतदार संघात येताच आ केसरकर यांनी घेतला विकासकामांचा आढावा

कामे प्रलंबित राहिल्यास खपवून घेणार नसल्याचा दिला इशारा

⚡सावंतवाडी ता.१२-:* तालुक्यात राहिलेली कामे बाहेरचे ठेकेदार घेऊन पूर्ण करा. तीन तीन वर्ष कामे होत नाहीत. हे खुपवून घेणार नाही. असा इशारा आमदार दीपक केसरकर यांनी दिला. श्री.केसरकर यांच्या उपस्थितीत आज आढाव बैठक येथील तहसील कार्यालयात संपन्न झाली.यावेळी श्री.केसरकर बोलत होते.

यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, आबोली येथे शिकावु वायरमन असून, सद्या तेथे हंगाम सुरू असल्याने तेथे अनुभवी वायरमन पाठवा, तसेच मोती तलावाचे दोन्ही गेट दुरुस्त करून, मोती तलावाच्या संरक्षण भिंती साठी संयुक्त रित्या निवेदन पाठवा. आमदार निधीतून निधी देतो. अशा विविध मुद्द्यांवर आज तहसीलदार कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते.

You cannot copy content of this page