कुडाळात भाजपने केले रास्ता रोखो आंदोलन

रस्त्यातील खड्ड्यांवरून घेतली आक्रमक भूमिका;मुख्याधिकारी यांच्या आश्वासनानंतर केले आंदोलन स्थगित

⚡कुडाळ ता.१२-: शहरात रस्त्यांवर वाढलेल्या खड्ड्यांमुळे येथून वाहतूक करणाऱ्या वाहन धारकांना खड्यातून जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याने या बाबत आज दुपारी कुडाळ शहर भाजप तर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले .यावेळी प्रशासनाच्या कामकाजा विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

शहरातील पोलीस स्टेशनच्या नजीकत असलेल्या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांच्या बाजूला भाजप शहर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले. यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला त्यामुळे घटनास्थळी कुडाळ पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे आणि त्यांची टीम हजर झाली. काही वेळातच कुडाळ नगरपंचायत चे मुख्य अधिकारी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी आंदोलकांशी चर्चा करून लवकरच खड्ड्यांचा प्रश्न मार्गी लावला जाईल असे आश्वासन दिले.

कुडाळ पोलीस स्टेशन, गांधी चौक सह मुख्य रस्त्याजवळ साईट पट्टी नजीकच्या सातलेल्या चिखलाच्या साम्राज्यामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासावरून आंदोलन छेडण्यात आले .

या आंदोलनात भाजपची युवा नेते आनंद शिरवालकर ,जिल्हा परिषद माजी अध्यक्ष दीपलक्ष्मी पडते, भाजप शहर अध्यक्ष राकेश कांदे ,शक्ति केंद्रप्रमुख राकेश नेमळेकर, नगरसेविका प्राजक्ता बांदेकर ,नगरसेवक निलेश परब, नगरसेवक गणेश भोगटे, नगरसेवक राजीव कुडाळकर,चांदणी कांबळी,बंड्या सावंत,प्रज्ञा राणे, रेवती राणे आदी कार्यकर्ते व स्थानिक उपस्थितीत होते.

You cannot copy content of this page