कणकवली शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाची सभासदांसाठी मोफत कुपन योजना

⚡कणकवली ता.१२-: कणकवली तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करीत असून या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त संघाच्यावतीने सभासदांसाठी ‘ सुवर्णसंधी निर्माण करून देण्यात येत आहे . या निमित्ताने प्रत्येक सभासदाला ५०० रुपयांचे मोफत कुपन देण्यात येत असून खरेदी विक्री संघाच्या कोणत्याही शाखेतून एवढ्या रक्कमेचा माल खरेदी करू शकतात , अशी माहिती कणकवली तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष विठ्ठल देसाई यांनी दिली.

विठ्ठल देसाई म्हणाले , ५० वर्षापूर्वीच्या आठवणींचा मागोवा घेतला असता येथील अवसायनात गेलेल्या पूर्वप्रस्थापित संघाची पुन्हा त्याच रुपातील शेतकरी सहकारी संघ रूपी सहकार मंदिर उभारण्याचा एक धाडसी निर्णय तत्कालीन संस्थापक अध्यक्ष सहकार महर्षी शिवराम भाऊ जाधव यांनी केला . हे काम करीत असताना स्व. मनोहरभाऊ सावंत तत्कालीन सहाय्यक निबंधक पी . डी . राणे , भाईसाहेब खोत , कै . सावंत , शशिकांत राणे , कांता शेट्ये , डॉ . वसंत राणे यासारख्या असंख्य सहकाऱ्यांच्या मदतीने रु . २२५० चे शेअर्स गोळा करुन या शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाची स्थापना १६ मे १ ९ ७३ रोजी झाली . १ ९ ७३ ते सन २०१५ या ४२ वर्षांच्या कालखंडात कै . शिवराम भाऊ जाधव , कै . मनोहर सावंत , शशिकांत राणे , काशिनाथ राणे , कै . दिपा दळवी , मुरलीधर नाईक , कै . चांदजी राणे , मिलिंद मेस्त्री, विद्यमान उपाध्यक्ष प्रकाश सावंत या सर्वांनी आपल्या अध्यक्ष व उपाध्यक्ष जबाबदारी यशस्वीरित्या सांभाळली . संघाचे पहिले व्यवस्थापक कै . रमाकांत सावंत यांची १ ९ ७३ ते १ ९ ८२ पर्यंतची यशस्वी कारकिर्द केली . त्यानंतर जयवंत तावडे , मनोहर गवस , शुभदा तावडे , प्रकाश घाडीगांवकर , अनिल सुखटणकर व विद्यमान व्यवस्थापक गणेश तावडे यांनी व्यवस्थापक पदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली . संस्थेच्या ठेवी आज १ कोटी झालेल्या आहोत . संस्थेच्या यंदाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सुवर्ण महोत्सवी भेट म्हणून ही कुपन योजना जाहिर करण्यात आली आहे . प्रत्येक सभासदाला ५०० रुपयांचे कुपन देण्यात येणार असून त्यावर संघाच्या कोणत्याही शाखेत ५०० रुपयांची खरेदी करता येणार आहे . ही योजना १५ ऑगस्ट २०२२ ते १६ मे २०२३ या कालावधीसाठी असणार असल्याची माहितीही विठ्ठल देसाई यांनी दिली .

You cannot copy content of this page