शिंदे गटाचे प्रवक्ते आ केसरकर यांची माहिती
⚡सावंतवाडी ता.१२-: सगळ्या आमदारांनी उठाव केला त्या उठावात मी सहभागी झालो. परंतु, हा उठाव का झाला , या मागची नेमकी भूमिका काय होती. याबाबत जनतेला माहित असणे आवश्यक आहे. त्यांनीच आम्हाला आमदार केले आहे. त्यामुळे येत्या 15 तारीख ला दुपारी 2 वाजता सभा घेऊन माझी भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती आमदार दीपक केसरकर यांनी सावंतवाडी येथील आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.
