भजनी सप्ताहानिमित्त संगीत-वारकरी मंडळांना निमंत्रित

⚡वेंगुर्ला ता.१२-: वेंगुर्ल्याचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वराचा अखंड भजनी सप्ताहाला गुरुवार दि.१४ जुलै पासून प्रारंभ होत असून दररोज होणा-या अष्टोप्रहर भजनांबरोबरच १५ संगीत व वारकरी भजन मंडळांना निमंत्रित करण्यात आले आहे.

  श्री रामेश्वराच्या प्रसिद्ध भजनी सप्ताहानिमित्त मंदिर परिसरात बेल, फुले यासह खेळणी, हॉटेल्स आदींची दुकाने थाटण्यात आली आहेत. सप्ताह कालावधीत रज होणा-या अष्टोप्रहर भजनांबरोबर १४ भजनी मंडळांना निमंत्रित केले आहे. दि.१४ रोजी सायं. ७ वा. - विठ्ठल पंचायतन सांप्रदाय-सुरंगपाणी, रात्रौ ८.३० अरतकर भजन मंडळ आनंदवाडी, दि.१५ रोजी सायं.७ वा. जनता सेवा भजन मंडळ, परबवाडा, रात्रौ ८.३० वा. दत्तप्रासादिक भजन मंडळ कुबलवाडा, रात्रौ ९.३० वा. अचानक भजन मंडळ, दि.१६ जुलै रोजी सायं.७ वा. ओमकार भजन मंडळ आडारी, रात्रौ ८.३० वा. सद्गुरु भजन मंडळ, तुळस, दि.१७ जुलै रोजी सायं.७ वा. ब्राह्मण प्रासादिक भजन मंडळ नमसवाडी, रात्रौ ८.३० वा. वाटोबा भजन मंडळ, उभादांडा, दि.१८ जुलै रोजी सायं.७ वा. ब्राह्मण प्रासादिक भजन मंडळ रेडी, रात्रौ ८.३० वा. देऊळवाडा भजन मंडळ-वेंगुर्ला, दि.१९ जुलै रोजी सायं.७ वा.ब्राह्मण प्रासादिक भजन मंडळ-भेंडमळा, रात्रौ ८ वा. बागायतवाडी भजन मंडळ-शिरोडा, दि.२० जुलै रोजी सायं. ७ वा. मुळपुरुष भजन मंडळ-वडखोल, रात्रौ ८.३० वा. धावडेश्वर भजन मंडळ-कॅम्प आदी मंडळांची भजने सादर होणार आहेत.

  तरी भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री रामेश्वर देवस्थान ट्रस्ट तर्फे करण्यात आले आहे.
You cannot copy content of this page