Headlines

कारिवडे माध्यमिक विद्यालयातील आठवीच्या मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप

बांदा येथील सौ वैशाली येडवे यांचे दातृत्व ⚡सावंतवाडी ता.२१-: कारिवडे येथील परमपूज्य आप्पासाहेब पटवर्धन माध्यमिक विद्यालयातील इयत्ता आठवीच्या मुलांना गणवेश व क्रीडा साहित्य वह्या असे शैक्षणिक साहित्य बांदा येथील सौ वैशाली भालचंद्र येडवे हिने दिले त्याचे वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आले त्यांच्या मातोश्री सेवानिवृत्त अंगणवाडी शिक्षिका सौ सुहासिनी भालचंद्र येडवे व कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी…

Read More

कोलगाव येथील गोदाम इमारत कामात भ्रष्टाचार

सध्या ठरत आहे अवैध धंद्यांचा अड्डा;जागा निवडणाऱ्या अधिकाऱ्यां विरोधात पुंडलिक दळवी यांचा उपोषणाचा इशारा ⚡सावंतवाडी ता.२१-: नाबार्ड ग्रामीण पायाभूत विकास निधीतून कोलगाव येथे अठराशे मॅट्रीकटन क्षमतेच्या शासकीय गोदामाची इमारत उभारण्यात आली आहे. सदर कामात शासनाच्या माध्यमातून करोडो रुपये खर्च करून मोठा आर्थिक भ्रष्टाचार करण्यात आला आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी केला…

Read More

भाजपा–सेना सरकारच्या इच्छाशक्तीमुळेच ओबीसींना राजकीय आरक्षण

भाजपाचे सिंधुदूर्ग जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केले अभिनंदन ⚡कणकवली ता.२१-: राज्यात नुकत्याच सत्तेवर आलेल्या भाजपा – शिवसेना सरकारच्या इच्छाशक्तीमुळेच ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय आरक्षण मिळाले आहे. ओबीसी राजकीय आरक्षणाच्या वचनपूर्तीबद्दल आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करतो, असे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी सांगितले. राजन तेली म्हणाले की,…

Read More

भरवस्तीत फिरणाऱ्या गवारेड्यामुळे खान मोहोल्यात भीतीचे वातावरण…

प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी; शफीक खान यांची मागणी ⚡सावंतवाडी ता.२१-: झाराप येथील खान मोहोल्ला येथे आज भरवस्तीत गवारेडे फिरताना आढळून आले असून, त्यामुळे तेथील नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने त्यावर लक्ष देऊन तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सिंधुदुर्गचे नेते शफीक खान यांनी केली आहे.

Read More

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंमलबजावणीसाठी
आय टी असिस्टंट पदासाठी 29 जुलै पर्यंत अर्ज करावेत

⚡सिंधुदुर्गनगरी दि.२१-: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंमलबजावणीसाठी 20 हजार प्रति महिना मानधनावर केवळ कंत्राटी स्वरुपात तात्पुर्त्या कालावधीसाठी आय टी असिस्टंट या पदांची बाह्यस्थ पद्धतीने सेतू समितीमार्फत भरती करण्यात येणार आहे. 22 जुलै ते 29 जुलै सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत इच्छुकांनी अर्ज सादर करावेत असे आवाहन जिल्हा सेतू समितीच्यावतीने करण्यात आले आहे. यापदासाठी कोणत्याही शाखेची पदवी…

Read More

आरोस नागोजी शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

मनसे सावंतवाडी शहराध्यक्ष आशिष सुभेदार यांचा उपक्रम ⚡सावंतवाडी ता.२१-: मनसेच्या वतीने आरोस नागोजी शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणीक साहित्याचे वाटप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सावंतवाडी शहराध्यक्ष आशिष सुभेदार यांच्या माध्यमातून करण्यात आले.तसेच आरोस मनसेच्यावतीने जिल्हा परिषद शाळा आरोस नागोजी या शाळेतील विद्यार्थ्यांना मनसे पदाधिकाऱ्यांचे हस्ते शैक्षणिक साहित्याचे (दप्तर,वह्या)वाटप करण्यात आले. आरोस मनसे शाखा व मळेवाड मतदार संघ मधील…

Read More

कणकवली तालुक्यात सर्वाधिक 9.7 मि.मी. पाऊस

⚡सिंधुदुर्गनगरी ता.२१-: गेल्या चौवीस तासात कणकवली तालुक्यात सर्वाधिक 9.7 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 4.9 मि.मी. पाऊस झाला आहे. तर एकूण सरासरी 1826.8 मि.मी. पाऊस झाला आहे.

Read More

रानभाज्यांचे महत्त्व तरुणाईला
समजणे गरजेचे :प्रा.आरोलकर

⚡कणकवली ता.२१-:रानभाज्यांचे महत्त्व व त्यांची परंपरा आजच्या पिढीला तेवढी माहिती नाही आहे . ते महत्त्व तरुणाईला समजणे अत्यंत गरजेचे आहे . रिगल कॉलेज कणकवली आयोजित रानभाज्या पाककृती सादरीकरण स्पर्धेवेळी प्राचार्य आरोलकर बोलत होते . कोकणामधे पावसाळ्यात अनेक भाज्या उपलब्ध असतात . त्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे सुद्धा आहेत . त्याच अनुषंघाने हॉटेल मॅनेजमेंट विभागाच्या विद्यार्थ्यांनी रानभाज्यांचा…

Read More

जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत निता सावंत प्रथम

⚡कणकवली ता.२१-: कणकवली तालुक्यातील हळवल येथील सामाजिक कार्यकर्त्या सविता संजय जाधव यांच्या स्मृतीप्रित्यर्थ जाधव परिवारातर्फे आयोजित जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत कुणकेरी (ता. सावंतवाडी) येथील सौ. निता नितीन सावंत यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. कुडाळ येथील शीतल किरण कदम व वैभववाडी येथील अक्षय काशिराम सुतार यांनी द्वितीय तर देवगड येथील सुनील शंकर जाधव व मालवण येथील…

Read More

केंद्र शाळांत फायबर केबलद्वारे इंटरनेट सुविधा पुरवा

प्राथमिक शिक्षक संघाची सीईओ प्रजित नायर यांच्याकडे मागणी ⚡सिंधुदुर्गनगरी ता.२२-: जिल्ह्यातील केंद्रस्तरीय शाळेत फायबर केबल द्वारे इंटरनेट सुविधा उपलब्ध करून कायमस्वरूपी डाटा एन्ट्री ऑपरेटर देण्यात यावा, अशी मागणी अखिल सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष राजा कविटकर यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्याकडे आज निवेदनाद्वारे केली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील सर्व…

Read More
You cannot copy content of this page