भरवस्तीत फिरणाऱ्या गवारेड्यामुळे खान मोहोल्यात भीतीचे वातावरण…

प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी; शफीक खान यांची मागणी

⚡सावंतवाडी ता.२१-: झाराप येथील खान मोहोल्ला येथे आज भरवस्तीत गवारेडे फिरताना आढळून आले असून, त्यामुळे तेथील नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने त्यावर लक्ष देऊन तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सिंधुदुर्गचे नेते शफीक खान यांनी केली आहे.

You cannot copy content of this page