जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत निता सावंत प्रथम

⚡कणकवली ता.२१-: कणकवली तालुक्यातील हळवल येथील सामाजिक कार्यकर्त्या सविता संजय जाधव यांच्या स्मृतीप्रित्यर्थ जाधव परिवारातर्फे आयोजित जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत कुणकेरी (ता. सावंतवाडी) येथील सौ. निता नितीन सावंत यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.

कुडाळ येथील शीतल किरण कदम व वैभववाडी येथील अक्षय काशिराम सुतार यांनी द्वितीय तर देवगड येथील सुनील शंकर जाधव व मालवण येथील माधवी लिलाधर तिरोडकर यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. स्पर्धेचे परिक्षण डीएड कॉलेजचे प्रा. नागेश कदम यांनी केले. विजेत्यांना २४ जूलैला सायंकाळी ४ वा. हळवल ग्रामपंचायत येथील कार्यक्रमात रोख रक्कम, प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात येणार आहे. सर्व सहभागींनाही प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. उपस्थित रहावे, असे आवाहन जाधव परिवारातर्फे संजय जाधव व संग्राम कासले यांनी केले आहे.

You cannot copy content of this page