रानभाज्यांचे महत्त्व तरुणाईला
समजणे गरजेचे :प्रा.आरोलकर

⚡कणकवली ता.२१-:
रानभाज्यांचे महत्त्व व त्यांची परंपरा आजच्या पिढीला तेवढी माहिती नाही आहे . ते महत्त्व तरुणाईला समजणे अत्यंत गरजेचे आहे . रिगल कॉलेज कणकवली आयोजित रानभाज्या पाककृती सादरीकरण स्पर्धेवेळी प्राचार्य आरोलकर बोलत होते .

कोकणामधे पावसाळ्यात अनेक भाज्या उपलब्ध असतात . त्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे सुद्धा आहेत . त्याच अनुषंघाने हॉटेल मॅनेजमेंट विभागाच्या विद्यार्थ्यांनी रानभाज्यांचा वापर करून नाविन्यपूर्ण पदार्थ तयार करून सदर केले . विद्यार्थ्यांनी भारंगी , अळंबी , कुरडू , करटूली , एक पानाची भाजी , पेवगा , अळू , कुडाच्या शेंगा , टायका अश्या विविध भाज्यांचा वापर केला . त्याचप्रमाणे प्रत्येक भाजीचे आयोग्यासाठीचे असणारे फायदे सुद्धा त्यांनी इतर मुलांना सांगितले .
प्राचार्य आरोलकर , प्रा . सौ . मधुरा सावंत व सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख शिवानी काळसेकर यांनी सर्व स्पर्धकांचे अभिनंदन केले . त्याचप्रमाणे हॉटेल मॅनेजमेंट विभागाचे प्रमुख प्रा . मुकुंद मुद्राळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .

You cannot copy content of this page