केंद्र शाळांत फायबर केबलद्वारे इंटरनेट सुविधा पुरवा

प्राथमिक शिक्षक संघाची सीईओ प्रजित नायर यांच्याकडे मागणी

⚡सिंधुदुर्गनगरी ता.२२-: जिल्ह्यातील केंद्रस्तरीय शाळेत फायबर केबल द्वारे इंटरनेट सुविधा उपलब्ध करून कायमस्वरूपी डाटा एन्ट्री ऑपरेटर देण्यात यावा, अशी मागणी अखिल सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष राजा कविटकर यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्याकडे आज निवेदनाद्वारे केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील सर्व प्राथमिक शाळांची अनेक प्रकारचा कामे ऑनलाईन करावी लागत आहेत. शालेय पोषण आहार, शिक्षकाचे नियमित वेतन विविध प्रणालीद्वारे प्राप्त होणारी अनुदाने, सरल पोर्टल वरील कामे व विविध प्रशिक्षण यासाठी कायमस्वरूपी इंटरनेट सुविधा अत्यावश्यक आहे. ग्रामीण भागात तसच शहरा भागातही वारंवार येणारी ऑनलाइन कामे करण्यासाठी शिक्षकांना सायबर कॅफे किंवा इतर मदत घ्यावी लागते. काही वेळा या कामांसाठी शाळेच्या वेळेत बाहेर जाव लागत परिणामा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर याचा परिणाम होत आहे. अनेक शाळा एक शिक्षकी असल्याने अशा शाळांमधील शिक्षकांची काम करत असताना फरपट होत आहे याचा अनिष्ट परिणाम त्यांच्या मानसिकतेवर होत आहे. अतितातडीची माहिती मागितल्यानंतर कोणतीही सुविधा नसताना अशी कामे करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक पदरमोडही करावी लागते. यासाठी कोणतीही स्वतंत्र तरतूद करण्यात आलेली नाही.

 तरी या सर्व समस्यांचा विचार करून ग्रामपंचायत स्तरावर पुरविण्यात आलेल्या सुविधेप्रमाणे केंद्रस्तरीय शाळेत फायबर केबल द्वारे इंटरनेट सुविधा उपलब्ध करून कायमस्वरूपी डाटा एन्ट्री ऑपरेटर देण्यात यावा. यातून शिक्षकांच्या वेळेचा होणारा अपव्यय थांबून त्याचा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी चांगला फायदा होणार आहे. तरी केंद्रस्तर किंवा केंद्रातील सोयीच्या कोणत्याही शाळेत सुविधा उपलब्ध करून देऊन कामास गती द्यावी, अशी मागणी अखिल सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष राजा कविटकर यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
You cannot copy content of this page