कारिवडे माध्यमिक विद्यालयातील आठवीच्या मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप

बांदा येथील सौ वैशाली येडवे यांचे दातृत्व

⚡सावंतवाडी ता.२१-: कारिवडे येथील परमपूज्य आप्पासाहेब पटवर्धन माध्यमिक विद्यालयातील इयत्ता आठवीच्या मुलांना गणवेश व क्रीडा साहित्य वह्या असे शैक्षणिक साहित्य बांदा येथील सौ वैशाली भालचंद्र येडवे हिने दिले त्याचे वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आले त्यांच्या मातोश्री सेवानिवृत्त अंगणवाडी शिक्षिका सौ सुहासिनी भालचंद्र येडवे व कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेचे तालुकाध्यक्ष तथा जिल्हा पत्रकार संघाचे खजिनदार एडवोकेट संतोष सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी एडवोकेट सावंत यांनी देणाऱ्याचे मन मोठे लागते मोठ्या मनाने शालेय मैत्री ची उतराई  वैशाली येडवे हिने मदत स्वरूपाच्या माध्यमातून केली अशी मैत्री प्रत्येकाने शालेय जीवनातच जोपासायला हवी पुढील आयुष्यात ती आपल्याला प्रेरणादायी ठरेल असे ते म्हणाले कारिवडे येथील आप्पासाहेब पटवर्धन माध्यमिक विद्यालय येथे झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून श्री सावंत उपस्थित होते तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सौ येडवे शाळेच्या शिक्षिका सौ अर्चना संतोष सावंत शिक्षक एकनाथ उदार आदि व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन दीप प्रज्वलन करून सौ येडवे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी वैशाली येडवे यांच्याकडून शाळेतील इयत्ता आठवीच्या मुलांना गणवेश व इयत्ता नववी व दहावीच्या मुलांना वह्या तसेच या शाळेला क्रीडाविषयक व्हॉलीबॉल चे साहित्य भेट म्हणून देण्यात आले त्याचे वाटप यावेळी विद्यार्थ्यांना करण्यात आले यावेळी सौ येडवे यांचा शाळेच्या वतीने भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन ऍडव्होकेट सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना एडवोकेट सावंत म्हणाले पैसा प्रत्येकाकडे आहे पण त्या पैशाचा योग्य विनियोग आणि पैसे सड ळ हस्ते देण्याची मनात इच्छा असायला हवी मदत करण्यासाठी मन मोठं हवा शालेय जीवनात आपण जे बाळकडू शिक्षक गुरुजन आणि आई-वडिलांकडून घेतो आणि आपलं त्यावेळी जे मन तयार होतं आणि तीच खरी आपली पुढील जीवनाची शिदोरी असते आणि या शिदोरीची उतराई असे दा तृत्वाच्या माध्यमातून करायला हवे आणि हे कार्य परदेशात जाऊनही न विसरलेल्या वैशाली येडवे आहेत आपल्या शालेय जीवनातील मैत्रिणीची शाळा आणि त्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्या त्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे आणि त्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी मदतीचा हात पुढे करून नवा आदर्श मैत्रीचा घालून दिला आहे विद्यार्थ्यांनी आपलं मन ओळखून आपण भविष्यात काय करायला हवे हे इयत्ता आठवी पासूनच निश्चित करायला हवे समाजकारण आणि आपल्या अवतीभोवती असलेल्या संपूर्ण भागाचा स्वतः परिचय अभ्यास रूपात करायला हवा मी एक दिवशी असं बनणार हे मनाला सांगा आणि त्या दिशेने ध्येय निश्चित करा तुम्ही तुमचे आई-वडील गुरुजन थो रा मोठ्यांशी सौजन्याने वागायला हवे आपल्या उज्वल भवितव्यासाठी अनेक मदतीचे हात आपल्या मागे आहेत आपण फक्त चांगल्या ध्येयाचा विचार करायला हवा असे ते म्हणाले कोमसाप शाळा भेटीला हा उपक्रम राबविण्यात येत आहे आणि त्याची खरी सुरुवात या शाळेतून झाली आहे साहित्य क्षेत्रात कोकण मराठी साहित्य परिषद चे कार्य यावेळी विद्यार्थ्यांना स्पष्ट केले यावेळी प्रास्ताविकात शिक्षिका सौ अर्चना सावंत यांनी गेली वीस वर्ष आमच्या शाळेला अनेकांनी विविध रूपाच्या माध्यमातून मदत कार्य केले आहे गेल्या तीन वर्षात अनेक दात्याने विविध प्रकारे मदत कार्य केले पण माझ्या शालेय जीवनात माझ्यासोबत असलेली माझी मैत्रीण वैशाली येडवे ही सध्या परदेशात कतार येथे आहे आणि असे असतानाही तिने माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने शैक्षणिक साहित्य देऊन आमच्या प्रशालेला मुलाचे सहकार्य केले आहे मैत्री काय असते आणि ती कशी निभावायला हवी हे तिने दाखवून दिले आहे तिनेही केलेली मदत मी कधीही विसरू शकणार नाही यावेळी सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार विद्यार्थिनी अंकिता परब हिने मानले यावेळी कर्मचारी विष्णू परब श्रीमती पी व्ही जाधव आधी विद्यार्थी उपस्थित होते फोटो सावंतवाडी कारिवडे येथील परमपूज्य आप्पासाहेब पटवर्धन माध्यमिक विद्यालय येथे विद्यार्थ्यांना गणवेश व वह्या क्रीडा शैक्षणिक साहित्य वाटप करताना सुहासिनी येडवे बाजूला एडवोकेट संतोष सावंत शिक्षिका अर्चना संतोष सावंत एकनाथ जाधव विद्यार्थी आदी.

You cannot copy content of this page