जि. प. सदस्य विजय नाईक यांनी घेतली आडेली ग्रामस्थांच्या पाणी समस्येची दखल…

योग्य प्रमाणात पाणी उपलब्धता असल्यास बोअरवेलद्वारेच पाणीपुरवठा योजना..

⚡वेंगुर्ला ता.०४-: वेंगुर्ला तालुक्यातील आडेली खुटवळवाडी येथील काही ग्रामस्थांच्या पाणी समस्येबाबत पत्रकार अजय गडेकर यांनी वृत्तपत्रद्वारे वेंगुर्ला पंचायत समिती प्रशासनाचे लक्ष वेधले होते. दरम्यान याबाबत माहिती मिळताच आडेली जिल्हा परिषद नवनिर्वाचित सदस्य विजय नाईक यांनी त्वरित आज बुधवारी ( 4 मार्च ) सायंकाळी आडेली खुटवळवाडी येथे भेट दिली व पाहणी केली. यावेळी विजय नाईक यांच्यासह चंद्रकांत वालावलकर, ग्रामस्थ दिपक गडेकर, शेतकरी अशोक गडेकर, सदानंद परुळेकर, पत्रकार अजय गडेकर आदी उपस्थित होते. यावेळी त्यांनी येथे बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीची व बोअरवेलची पाहणी केली. येथील बोअरवेलला जर योग्य प्रमाणात पाण्याची उपलब्धता असेल तर येथील नजिक बांधण्यात आलेल्या टाकीद्वारे खुटवळवाडी कार्यक्षेत्रातील ग्रामस्थांना पाण्याचा नळपाणी योजनाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. दरम्यान येथे असलेल्या बोअरवेलला पाण्याची उपलब्धता असून
तालुका पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी यांच्याशी संपर्क व चर्चा करून येथे असलेल्या बोअरवेलची प्रशासनाने पाहणी करून त्यावरून खुटवळवाडी कार्यक्षेत्रात पाणीपुरवठा बाबत कार्यवाही करण्याच्या सूचना देण्याचे आश्वासन त्यांनी उपस्थित ग्रामस्थांना दिले. आडेली ग्रामपंचायत मध्ये आपण पाण्याच्या समस्येबाबत चर्चा केली असून आडेली खुटवळवाडी येथील ग्रामस्थांच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा आपला प्रयत्न राहील, असे यावेळी त्यांनी आश्वासित केले. दरम्यान याबाबत आडेली ग्रामपंचायत सरपंचा यशस्वी कोंडसकर यांनी पाणीपुरवठा विभाग, संबंधित ठेकेदार यांना खुटवळवाडी येथील पाण्याच्या टाकीचे काम पूर्ण करण्याबाबत सलग पत्रव्यवहार करुनही प्रशासनाचे याबाबतीत दुर्लक्ष का? असा सवाल व्यक्त करण्यात येत आहे.

You cannot copy content of this page